मुखेड नगर परिषदेचे संस्था व गुत्तेदारांना पाठबळ तर "मजुर कामगार वाऱ्यावर"
मुखेड नगर परिषदेचे संस्था व गुत्तेदारांना पाठबळ तर "मजुर कामगार वाऱ्यावर"
मुखेड/प्रतिनिधि :-
मुखेड नगर परिषद प्रशासनाच्या सोईसाठी व विविध कामे करण्यासाठी अनेक संस्था व व्यक्तिगत गुत्तेदारां मार्फत मनुष्यबळ व कामगार ईतर यंत्रणा पुरवण्यासाठी करारनामे करुन कामे देण्यात आलेली आहेत . त्या प्रत्येक करारनाम्यात गुत्तेदाराने पुरवण्यात आलेल्या कामगारास कामगार विषयक सर्व नियम भविष्य निर्वाह निधी , किमान वेतन कायदा , कामगार विमा , गट विमा , आरोग्य सुविधा व ईतर सर्व सुविधा पुरवणे बंधनकारक असुन निविदा मंजुर झाल्यानंतर भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 अन्वये ई.पी.एफ. क्रमांक असणे आवश्यक असुन तो नसल्यास तो एक महिन्यात काढुन घेणे बंधनकारक आहे असे करारनाम्यात स्पष्टपणे नमुद आहे .
कंत्राटदारांनी एक वर्ष होऊनही ई .पी .एफ क्रमांक नपाला आजपर्यंत दिलेला नाही . कंत्राटदारा मार्फत ई.पी.एफ. भरणे दुरच राहिले , अशाच एका प्रकरणात मे . मजुर सहकारी संस्था म . कुंद्राळा या संस्थेस मजुर पुरवण्यासाठी 16 डिसेंबर 2019 रोजी करारनामा करुन नपा . मुख्याधीकारी मार्फत कंत्राट देण्यात आले . या वा गुत्तेदाराकडे काम करणार्या फारुक पठाण या कामगाराचा लोहगाव येथे दि .18 जानेवारी रोजी दुर्दैवी अपघात होऊन मृत्यु झाला पण या कंत्राटदाराने मयत फारुखसह त्याच्याकडे काम करणार्या कुठल्याही कामगाराचा कामगार विमा , गटविमा अथवा ईपीएफ भरलेला नाही त्यामुळे मयताच्या पत्नी मुलांना त्यांच्या मृत्युऊपरांत कोणतेच लाभ मिळत नाही.मुखेड नपा मध्ये ईतकी मोठी घटना होऊन सुध्दा प्रशासकिय अधिकारी व कर्मचारी कंत्राटदाराला का पाठबळ देतात , नपा हे प्रत्येक कंत्राटदारांना पाठबळ देण्यासाठी लक्ष्मीदेवी ची भेट तर घेतली नसेलना याकडे स . आयुक्त कामगार कल्याण विभाग नांदेड व ऊप प्रादेशिक अधिकारी भविष्य निर्वाह निधी औरंगाबाद यांचेही दुर्लक्ष होत आहे . असे कामगार क्षेत्रातील कार्यकर्ते अर्जुन रॅपनवाड यांनी सांगीतले व अशा प्रकरणी लवकरच कामगार कोर्टात दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली जात आहे .

Comments
Post a Comment