पंडित दीनदयालजी उपाध्याय स्मृतिदिना निमित्त समर्पण सप्ताहचे आयोजन :- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
पंडित दीनदयालजी उपाध्याय स्मृतिदिना निमित्त समर्पण सप्ताहचे आयोजन :- धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर
पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महानगर नांदेड च्या वतीने समर्पण दिन घेण्यात आला असून आगामी आठवड्यात समर्पण सप्ताह घेण्यात येणार असल्याची माहिती महानगराध्यक्ष प्रवीण साले व अभियान प्रमुख धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात सुरुवातीला जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक करताना ॲड. ठाकूर यांनी समर्पण दिना बद्दलची माहिती दिली. प्रवीण साले यांनी आपल्या भाषणातून पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवन कार्याची माहिती देऊन प्रत्येक भाजप सदस्याने समर्पण निधी देऊन सहकार्य करावे असे आवाहन केले. याप्रसंगी संघटन सरचिटणीस विजय गंभीरे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील धनेगांवकर, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस श्रावण भिलवंडे, जिल्हा उपाध्यक्ष अनिलसिंह हजारी, जिल्हा उपाध्यक्ष शितल खांडील, महिला प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शितल भालके, जिल्हा चिटणीस मारोतराव वाघ, मण्डल अध्यक्ष वैजनाथ देशमुख व आशिष नेरळकर, युवती प्रमुख महादेवी मठपती, महिला जिल्हा उपाध्यक्षा सुषमा ठाकूर, कार्यालय प्रमुख कुणाल गजभारे, सोशल मीडिया सहसंयोजक अक्षय अमिलकंठवार, प्राचार्य विनायक सिताबराव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Comments
Post a Comment