पाहणी,पंचनामे बस्स झाले,शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडू:- रयत क्रांती संघटना
पाहणी,पंचनामे बस्स झाले,शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडू:- रयत क्रांती संघटना मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद मुखेड तालुक्यात पिकांचे क्षेत्र जलमय झाले आहे.भूस्खलन,गारपिट,ढगफुटी झाल्यामुळे,प्रशासकीय स्थरावरून विमा कंपनीला सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याचे आदेशीत करा.शेतकऱ्यांनी सरकारच्या सांगण्यावरून पीकविमा भरला आहे,आज पिकांचे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीकडून सरकारला विमा मंजूर करून घेणे अशक्य होत असेल तर विम्याची संरक्षित रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.बेन्नाळ,गोजेगाव पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीची भरपाई ल.पा.विभागाकडून शेतकऱ्यांना मिळवून द्या.असे निवेदनात सांगीतले आहे. मुखेड तालुक्यात गारपीट,ढगफुटी झाल्याने पिकांचे पूर्ण तालुक्यातील क्षेत्र जलमय झाले आहे.अनेक ठिकाणी जमिनीचे भूस्खलन झाले आहे.प्रचंड पाऊस झाल्याने नदी-नाल्यांचा पूर शेतातुन वाहत आहे.अखंड पाऊस असल्याने शेतात पाणी थांबून आहे.यामुळे संपूर्ण पिके हातून गेली आहेत.या सर्व परिस्थितीत विमा मंजूर होतो.मात्र,अनेक शेतकऱ्यांना माध्यमज्ञान नाही,सुविधा उपलब्ध ...