माजी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती मुखेड श्री राम भारती सर यांचा कर्तव्यपूर्ती सत्कार सोहळा संपन्न
सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा बु येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा राजुरा बु अंतर्गत सर्व शिक्षकांनी मिळून येथे करण्यात आला. शासनाच्या नियमाप्रमाणे social distancing व फेस मास्क घालून कार्यक्रम पार पाडण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सचिन पाटील राजूरकर हे होते तर प्रमुख पाहुणे नवनियुक्त गट शिक्षण अधिकारी मा. शेटक!र सर हे होते, श्री पाटील बी. एम, श्री झम्पलवाड सर , श्री माकने सर हे सर्व्ह शिक्षण विस्तार अधिकारी, श्री दासरवार सर केंद्र प्रमुख खडगाव, श्री होनराव सर केंद्र प्रमुख अंबुलगा, बालाजी चंदावाड सर केंद्र प्रमुख राजुरा बु, श्री adv सुनील कुलकर्णी सर, श्री सचिन रामदिनवार , सुभाष दिग्रसकर , लांडगे सर, राजू गुरुजी इंगळे मुख्याध्यापक राजुरा बु, चंद्रकांत वाघमारे शालेय व्यवस्थापक समिती अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूजनाने झाली. तसेच वृक्ष लागवड करण्यात आली.
स्वागत गीतातून सौ कुलकर्णी मॅडम यांनी स्वागत केले. तसेच सन्मान चिन्ह, व पुष्प गुच्छ शाल, श्रीफळ देऊन आयोजकांच्या वतीने सत्कार केला गेला. प्रास्ताविक श्री बालाजी चंदावाड सर केंद्र प्रमुख राजुरा बु यांनी केले. श्री राम भारती सरांचा निरोप सन्मान चिन्, शाल श्रीफळ देऊन सहपत्नीक, सह परिवार यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलतांना श्री शेटकर सर यांनी राम भारती सरांच्या कार्याचा गौरव केला व त्यांच्या निरोगी आयुष्याची कामना केली. यावेळी बोलतांना श्री शेटकर सर ज्या प्रमाणे भारती सरानी मुखेड ता. प्राथमिक शिक्षनासाठी कर्तव्य दक्षतेने सेवा केली त्याच भावनेतून सर्व शिक्षिकांनी काम, सेवा, कर्तव्य , त्याग व समर्पण अश्या जीवनात पायऱ्या असाव्यात असे त्यानी सांगितले. तसेच ऑनलाइन शिक्षण पूर्ण विदयार्थ्या पर्यंत पोहोचले पाहिजे असे त्यानी सांगितले. सत्काराला उत्तर देतांना सत्कारमूर्ती श्री राम भारती असे म्हणाले कि मुखेड तालुक्यतील सेवकाळ ३ वर्षे १० महिने अविस्मरणीय होता सर्व शिक्षक निर्मळ पाण्याच्या झऱ्यासारखे काम करतात आता पर्यंतच्या सेवा काळात प्रेम आणि स्नेह भावांची वागणूक राजुरा परिसरातील शिक्षिकांनी दिली. त्याबदल सर्व शिक्षकांचे धन्यवाद व्यक्त करतो अश्या शब्दात त्यानी शिक्षकांचा गौरव केला व या पुढेही अश्याच सहकार्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री नवेकर सर, श्री शिरणजीपालवार सर यांनी केले.
यावेळी उपस्थितानी कोरोना महामारीच्या शासकीय सूचनांचे काटेकोर पणे पालन केले.

Comments
Post a Comment