मनसेच्या विविध मागण्यांसाठी तहसिल कार्यालयासमोर भव्य आंदोलन, मनसे तुमच्या सुखः दुःखात सदैव पाठीशी :- गजानन चव्हाण


 शेतकऱ्यांचा पीक कर्ज माफ कारच पण या भागातील सुशिक्षित बेरोजगार तरूणाना शासनाच्या योजने मार्फत  कर्ज दिले पाहिजे:- मॉन्टीसिंग जहागीरदार

 मनसेच्या विविध मागण्यांसाठी तहसिल कार्यालयासमोर भव्य आंदोलन




मुखेड प्रतिनिधी / बल्खी आसद
प्रधानमंत्री सन्मान निधीचे पैसे तात्काळ जमा करा,बियाणे न उगवलेल्या कंपनीवर गुन्हा दाखल करा,शेतकऱ्यांना  मुगाची नुकसान भरपाई द्या,बँकांची मनमानी कारभार त्वरीत बंद करा,गरिबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभ तात्काळ मिळवुन द्या व तालुक्यातील शेतकऱ्यांसह अनेक गोरगरिबांचे प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणी करत  दि.७ सप्टेंबर रोजी मनसेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर भव्य  आंधोलन करण्यात  आले

 संपूर्ण महाराष्ट्रात अगोदरच शेतकऱ्यांना बोगस सोयाबीन बियाण्यामुळे करावी लागलेली दुबार पेरणी केली असताना खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे  मुग,उडिद या सारख्या हाताशी आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून   शेतकरी खूप मोठ्या संकटात सापडला आहे .

तसेच  सतत शेतकऱ्यांची बँकांकडून होत असलेली अडवणुक व नाकारला जाणारा कर्ज पुरवठा  तसेच बँकेचे अधिकारी शेतकऱ्यांना विविध कारणावरुन त्यांना वेठीस धरले जात आहे.त्यासाठी प्रशासनाने बँकेच्या मनमानी कारभार बंद करुन, शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री सन्माननिधीचे पैसे जमा करावे,अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी व बोगस सोयाबीन बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणुक करणाऱ्या कंपणीवर तात्काळ गुन्हा दाखल करावे तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभ प्रत्येक गोरगरिबांना मिळवुन द्यावा अशा अनेक मागण्यासह मनसेचे जिल्हाअध्यक्ष  माँटीसिंग जहागिरदार,जिल्हाशहराध्यक्ष अब्दुल शफिक यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसेचे मुखेड तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मुखेड तहसिल कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले आहे.
यावेळी, मनसेचे  जिल्हाध्यक्ष रवि राठोड,रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर,जिल्हाध्यक्ष गजानन चव्हाण,जिल्हा सचिव उदगिर विधानसभा लकी पाटील सर,जिल्हा उपाध्यक्ष प्रभु मनसुके,विद्यार्थी सेना जिल्हध्यक्ष सुभाष भंडारे,जिल्हाउपाध्यक्ष संजय भुतापल्ले,दासरवार शिवानंद,लक्ष्मण गवते,शंकर पिटलेवाड,अशोक उमाटे,मंगलगे विजय,कैलास बनसोडे,बंटी कांबळे सह असंख्य मनसे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान