पाहणी,पंचनामे बस्स झाले,शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडू:- रयत क्रांती संघटना
पाहणी,पंचनामे बस्स झाले,शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडू:- रयत क्रांती संघटना
मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद
मुखेड तालुक्यात पिकांचे क्षेत्र जलमय झाले आहे.भूस्खलन,गारपिट,ढगफुटी झाल्यामुळे,प्रशासकीय स्थरावरून विमा कंपनीला सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असल्याचे आदेशीत करा.शेतकऱ्यांनी सरकारच्या सांगण्यावरून पीकविमा भरला आहे,आज पिकांचे नुकसान झाल्यानंतर विमा कंपनीकडून सरकारला विमा मंजूर करून घेणे अशक्य होत असेल तर विम्याची संरक्षित रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.बेन्नाळ,गोजेगाव पाझर तलाव फुटून झालेल्या नुकसानीची भरपाई ल.पा.विभागाकडून शेतकऱ्यांना मिळवून द्या.असे निवेदनात सांगीतले आहे.
मुखेड तालुक्यात गारपीट,ढगफुटी झाल्याने पिकांचे पूर्ण तालुक्यातील क्षेत्र जलमय झाले आहे.अनेक ठिकाणी जमिनीचे भूस्खलन झाले आहे.प्रचंड पाऊस झाल्याने नदी-नाल्यांचा पूर शेतातुन वाहत आहे.अखंड पाऊस असल्याने शेतात पाणी थांबून आहे.यामुळे संपूर्ण पिके हातून गेली आहेत.या सर्व परिस्थितीत विमा मंजूर होतो.मात्र,अनेक शेतकऱ्यांना माध्यमज्ञान नाही,सुविधा उपलब्ध नाहीत.त्यामुळे हा नुकसानग्रस्त शेतकरी विम्यापासून वंचित राहू शकतो.या सर्व परिस्थितीचा आढावा प्रशासनाने घेतला आहे.तेव्हा प्रशासकीय स्थरावरून विमा कंपनीला सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे आदेशीत केले पाहिजे.
शेतकरी हा आपल्या पिकांचा विमा हा विमा कंपनीच्या सांगण्यावरून भरत नाही,सरकारच्या सांगण्यावरून सरकार मध्यस्थ असल्यामुळे भरतो.आज,सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचे सरकारचे प्रतिनिधी पाहणीतुन सिद्ध झाले आहे.पाहणी,पंचनाम्यात वेळ काढून,नंतर कोणतातरी नियम पुढे करून,शेतकऱ्यांचा विमा नाकारायचा हे आता शेतकरी सहन करणार नाही.पिकांचे नुकसान डोळ्यासमोर आहे,तेव्हा सरकारने विमा कंपनीकडून विमा मंजूर करून घ्यावा,किंवा सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची संरक्षित रक्कम जमा करावी.बेंन्नाळ,गोजेगाव पाझर तलाव फटून जे शेतकऱ्यांचे नुकसान झाले,यासाठी ल.पा.विभाग जबाबदार आहे.या विभागाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्या.
आपल्या स्थरावरील विषयांवर तात्काळ कार्यवाही करावी व सरकारकडील विषयांवर तात्काळ निर्णय घेण्याची सरकारकडे शिफारस करावी.सर्व परिस्थिती डोळ्यासमोर असतांना पाहणी,पंचनाम्यात सरकारने वेळकाढूपणा न करता,तात्काळ शेतकऱ्यांना विम्याची संरक्षित रक्कम व मदत जाहीर करावी.अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिला आहे.
यावेळी सोबत शिवशंकर पाटील कलंबरकर, अनिल पाटील दापके,प्रदीप पाटील इंगोले,मनोज पाटील बनबरे,बालाजी पाटील माळेगावे,हाणमंत मुगवणे,अमोल बाऱ्हाळे,हाणमंत माने,शंकर पाटील आतनुरे,श्रीकांत कोठारे,सदानंद इंगोले,माधवराव बिरादार,विजय राठोड,गंगाधर शेटेवाड,माधव शिंदे आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment