सोयाबीन पिकावर करप्या रोगांचा प्रार्दुभाव: पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई दया:- शेतकरी पुत्र
सोयाबीन पिकावर करप्या रोगांचा प्रार्दुभाव: पंचनामे करुन शासनाने नुकसान भरपाई देवुन स्वतंञ्य पिकविम्याचा लाभ द्यावा अन्यथा हातात रुमणे घेवुन शेतकरी तहसील वर धडकणार : शेतकरी पुञ
मुखेड प्रतिनिधि:- तालुक्यातील सर्वाधिक पेरणी लागवडी क्षेञ असलेले सोयाबीन पिकांवर करप्या रोगांचा व चक्रीभुंगाअळीचा प्रार्दुभाव झाल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेञ बाधीत झाल्याने त्यांचे प्रशासनाकडुन तात्काळ पंचनामे करुन शासनाची भरीव मदत व पिकविम्याचा स्वतंञ्य लाभ देण्याची मागणी शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे व रमाकांत पाटील जाहुरकर यांनी नायब तहसिलदार पद्मावार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
तालुक्यात अगोदरच अतिवृष्टीमुळे मुग व ऊडीद पिक गेल्याने शेतकरी प्रचंड नैराश्यात असुन त्यातच सर्वाधिक पिकांचा पेरणी क्षेञ असलेले सोयाबीन पिकाला करप्या व चक्रीभुंग्याने घेरले असुन त्यामुळे ऐन बहरात आलेले सोयाबीन करपुन जात असल्याने शेतकरी अगोदरच कोरोना महामारी,जनावरावर आलेला लंपि आजार व मुग व ऊडीद पिक जास्त पाण्याने पुर्णता गेल्याने आता हौती ती सर्व मदार सोयाबीन पिकावर हौती ती पण हातची गेल्याने सरकार व प्रशासनाने शेतकर्यांचा अंत पाहु नये तात्काळ सरकारने भरीव नुकसान भरपाई व पिक विम्याचा स्वतंञ्य लाभ द्यावा अन्यथा तालुक्यातील शेतकरी मायबाप रुमणे घेवुन प्रशासन व सरकारच्या विरोधात मोर्चा काढुन रस्त्यावर ऊतरतील असा इशारा शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे व रमाकांत पाटील जाहुरकर यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला.निवेदनाच्या प्रती मुख्यमंञी,कृषिमंञी,ईफकोटौकीयो पिक विमा कंपनीला दिल्याचे ढौसणे यांनी सांगीतले.

Comments
Post a Comment