मुखेड अतिवृष्टी भागाची जिल्हाधिकारी इटनकर यांनी केली पाहणी
मुखेड प्रतिनिधि : बल्खी आसद। नांदेडचे जिल्हाधिकारी व्हिपीन इटनकर यांचा मुखेड तालुक्यातील अतिवृष्टी भागात पाहणी दौरा होता मुखेड तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात जाऊन प्रत्येक्ष शेतकय्रांच्या बांधावर जाऊन नुकसान ग्रस्त शेतकय्रांची विचारापूस करून त्यांच्या भावना समजून घेतल्या.
मुखेड येथिल मोतीनाला नदी काठावरील नुकसान ग्रस्त घराची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधले आणि नुकसान ग्रस्त घराचे तात्काळ पंचानामे करून त्यांना मदत मिळवून देणार असल्याचे नुकसान ग्रस्त नागरिकाशी बोलते वेळेस जिल्हाधिकारी इटनकर यांनी सांगितले.यावेळी मा .क.प.चे काॅम्रेड अकुश माचेवाड या तरूणानी जिल्हाधिकारी साहेबांना नदीकाठच्या नागरिकांची वेथा समजावून सांगितली.आणि मोतीनाला नदी पात्राला पुर येऊन जे घरात पाणी शिरून गोरगरीबांचे नुकसान झाले .त्याला कारणीभुत मुखेड शहरातीलच पुढारीच असल्याचे त्यांनी सांगितले.
अनेक पुढाय्रांनी मोती नाला नदीत अतीक्रमण करून ठेऊन स्व:ताची जमीन वाढवली.त्यामुळे पुराचे पाणी घरात शिरले असे सांगितले.व तात्काळ मानवी वस्तीच्या बाजूने संरक्षण भिंत बांधुन द्यावी.अशी मागणी केली. येथिल प्रस्थिती बद्दल सविस्तर माहिती जिल्हाधिकारी इटनकर यांनी समजून घेतली .यावेळी मुखेडचे तहसिलदार काशिनाथ पाटील ,तालुका कृर्षीअधिकरी शिवाजी शितोळे , भाजपाचे आमदार डाॅ .तुषार राठोड, मुख्याधिकारी विजय चव्हाण,नगरध्यक्ष बाबु सावकार देबडवार,नगरसेवक राहुल लोहबंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments
Post a Comment