जनतेने अमान्य केला जनता कर्फ्यु, जनहित विरोधी जनता कर्फ्यू रद्द
मुखेड जनतेने अमान्य केला जनता कर्फ्यु, जनहित विरोधी जनता कर्फ्यू रद्द
जनहित विरोधी जनता कर्फ्यूला नागरिक, व्यापाऱ्यांचा विरोध,विविध संघटनाने दिल निवेदन
शासनाचे नियम पाळून बाजारपेठ सुरु ठेवा:- तहसीलदार काशीनाथ पाटील।
मुखेड कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी आमदार डाॅ. तुषार राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आर्यवैश्य मंगल कार्यालयात व्यापारी व प्रशासनाची वतीने बैठक संपन्न झाली. याबैठकीत दि. १३ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता या छोट्या-मध्यमवर्गीय व्यापाऱ्यांच्या विरोधातील जनता कर्फ्यू जनतेला मान्य नाही.असे सोशलमिडीया द्वारे दर्शविला
कोव्हिड -१९ कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शासनाने मार्च महिण्यापासून लाॅकडाऊन केल्यामुळे गेल्या चार-पाच महिण्यात व्यापारी बांधव आर्थिक अडचणीत सापडला आहे. दुकान भाडे, घर खर्च, बॅकेचे लोन, कर्ज कसे फेडावे याविवंचनेत व्यापारी आहेत. लाॅकडाऊनमुळे देश-राज्याची अर्थव्यवस्था डबघाईस आल्याने शासनाने लाॅकडाऊन उठवत अनलाॅक केले. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढणार नाही या दृष्टिकोनातून व्यापाऱ्यांना योग्य त्या सुचना व नियम-अटी लागू करत व्यवसायास परवानगी देण्यात आली. आम्ही शासनाने दिलेल्या नियम अटीचे पालन करुन आपला व्यवसाय सुरु केला आहे. पण दि.१३ सप्टेंबर ते दि.२१ सप्टेंबर अशे ९ दिवस "जनता कर्फ्यू" व्यापारी बाजारपेठ बंद असल्याची माहिती सोशलमिडीया द्वारे यापाऱ्यांनी यानिर्णयास विरोध दर्शविला . जनता कर्फ्यू हा कोरोना थांबविण्याचा पर्याय नाही, उलट लघू व्यापारी, मिठाई-भाजीपाला आदी सह असंख्य व्यापारी अडचणीत येतील. जनजिवन विस्कळीत होऊ न देता, पूर्ववत बाजारपेठ सुरुच ठेवावे. अशी विनंती असंख्य व्यापारांच्या सहमतिने सह्या घेऊन मा तहसीलदार साहेबांनी तात्काळ निवेदनाची दखल घेत जनतेच्या हितात निर्णय दिला असुन सोमवार पासुन व्यापारीने आपला व्यवसाय शासनाच्य नियमा प्रमाणे चालवने ५ पेक्षा जास्त गर्दी राहु नये,मास्क,सेनिटाजऱ, सोशलडिस्टन्सचा वापर करावा जर कोणी ,नियमांचे पालन करत नसतील त्यांची गय केली जाणार नाही त्यांच्या वर कडक कारवाही करण्यात येईल असे तहसीलदार काशीनाथ पाटील नायब तहसीलदार,महेश हंडे यांनी दिला आहे
यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल जाजू, माजी नगरसेवक राहूल लोहबंदे, नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड, माजी उपनगराध्यक्ष संजय बेळीकर, माजी जि.प.सदस्य बालाजी बंडे, शिवसेनेचे शरद कोडगीरे, रियाज शेख,प्रहार तालुकाध्यक्ष शंकर वड्डेवार, शेख इस्माईल बागवान, हाजी नबीसाब बागवान, राष्ट्रवादीचे जयभिम सोनकांबळे, शादूल होनवडजकर, अशोक बच्चेवार, विश्वनाथ लोखंडे, अॅड.लक्ष्मण सोमवारे, गजानन लोखंडे, बबलु मुल्ला, अदनान पाशा, डाॅ.ए.पि.जे.अब्दुल कलाम समिती समाजसेवा समितीचे ईस्माईल पठाण, एस.के. बबलू, अब्दूल सय्यद, रऊफ शेख, गोपाळ पाटील, आदीसह झेराॅक्स असोसिएशन, खोका मालक संघटना, हाॅटेल चालक संघटना, मिठाई विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे कापड दुकान, भांडी दुकान, मोबाईल, कम्प्युटर, जनरल स्टोअर्स, मेकॅनिक आदी व्यापारी, नागरीक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment