प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुकाकार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्षपदी भारत सोनकांबळे , तर कार्याध्यक्षपदी आसद बल्खी,ता सचिवपदी मोती पाशा पाळेकर यांची निवड



मुखेड / प्रतिनिधी

 प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष मा.डी.टी.आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली संघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष सुर्यकांत तादलापूरकर , जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार यांच्या सहकार्याने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ , मुखेड तालुक्याची दि .७ सप्टेंबर रोजी मागील कार्यकारणीची मुदत संपल्यामुळे मुखेड तालुक्यातील सामाजिक , राजकिय , शेतकरी व जनसामान्यांच्या प्रश्नावर काम करत शोषित वंचीत व पिडीतांना लेखणीच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न व समस्या प्रशासना पर्यंत पोहचवून न्याय मिळवून देण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ मुखेड तालुक्यात कार्यरत असून नूतन कार्यकारणीसाठी शहरातील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांची बैठक घेण्यात आली . यावेळी पुणे येथील जेष्ट पत्रकार पाडुरंग रायकर यांना श्रद्धांजली वाहून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून पत्रकार संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी पत्रकार भारत सोनकांबळे यांची निवड करण्यात आली आहे . तालुका उपाध्यक्ष म्हणून पत्रकार नरसिंग अस्वले , गणेश आडे तर कार्याध्यक्षपदी असद बल्खी यांची निवड करण्यात आली . प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका अध्यक्षचा कार्यकाळ नुकताच संपला होता , त्यामळे नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली . यात सर्व पत्रकारांच्या एकमताने पुन्हा एकदा भारत सोनकांबळे यांची तालुकाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली , तालुका सचिव पदी मोतीपाशा पाळेकर तर कोषाध्यक्ष पदी शेख चाँद सावरगावकर यांची निवड करण्यात आली . सहसचिव म्हणून रवी सोनकांबळे , महानायक न्यूज चे मुख्य संपादक रमेश राठोड सह कोषाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख सचिन चव्हाण , सह प्रसिद्धी प्रमुख फेरोज मुजावर तालुका सहसंघटक बाबुराव वाघमारे , सह कोषाध्यक्ष राजू रोडगे , सल्लागार विठ्ठल कल्याणपाड , सह संघटक विठ्ठल पाटील येवतीकर , चंद्रकांत राजूरकर , सदस्य सायलू पोलिकोंडलवड , अमोल वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या नूतन कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे नांदेड जिल्ह्याचे पशुधन विमा अधिकारी डॉ.राहुल कांबळे , मनसेचे तालुका अध्यक्ष संतोष बनसोडे , नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार आदींनी पत्रकार सेवा संघाच्या नूतन कार्यकारणीस पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून सर्व कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोतीपाशा पाळेकर यांनी केले तर शेख चांदपाशा सावरगावकर यांनी आभार मानले



Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान