मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी कामशेट्टे ; कार्याध्यक्षपदी बबलु मुल्ला यांची निवड


 मुखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी कामशेट्टे ; कार्याध्यक्षपदी बबलु मुल्ला यांची निवड


मुखेड / प्रतिनिधी 

         मुखेड शहरामध्ये सामाजिक व राजकिय प्रश्नावर काम करत शोषित पिढितांना न्याय देण्यासाठी मुखेड तालुका पत्रकार संघटना ही कार्यरत असून मागील कार्यकारणीची मुद्दत संपल्यामुळे दि.६ सप्टेंबर रोजी जेष्ठ पत्रकार के.एन.कांबळे यांच्या अध्यक्षेखाली रामदास पाटील यांच्या फाॅर्म हाऊसवर  कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये या उद्देशाने  सॅनिटायझर, मास्कचा वापर करून व सोशल डिस्टंसिगचे पालन करीत सर्व पत्रकारांच्या उपस्थितीत लिंगैक्य राष्ट्रंसंत डाॅ.शिवलिंग शिवाचार्य व पुणे येथील जेष्ट पत्रकार पाडुरंग रायकर यांना श्रद्धांजली वाहून २०२०-२१ ची नुतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.

             यामध्ये अध्यक्षपदी अॅड.संदीप कामशेट्टे तर कार्याध्यक्षपदी बबलू मुल्ला, सचिवपदी महेताब शेख, मार्गदर्शक व सल्लागारपदी दादाराव आगलावे, शेखर पाटील, के.एन.कांबळे, शिवकांत मठपती, सुशिल पत्की, जयभीम सोनकांबळे, अॅड.आशिष कुलकर्णी, राजेश बंडे, दत्तात्रय कांबळे, रियाज शेख, अनिल कांबळे, संजय कांबळे, उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर डोईजड, रामदास पाटील, नामदेव श्रीमंगले, संघटकपदी अॅड.मिलिंद कांबळे, कोषाध्यक्षपदी संदीप पिल्लेवाड, सहसचीव विजय बनसोडे, सहसंघटकपदी भास्कर पवार, प्रसिद्धी प्रमुख मुस्तफा पिंजारी, सहकोषाध्यक्षपदी हफीज पठाण व कार्यकारिणी सदस्यपदी गंगाधर सोंडारे, जैनोद्दीन पटेल, पवन जगडमवार व संजय पिल्लेवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

           कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ज्ञानेश्वर डोईजड यांनी तर अॅड.आशिष कुलकर्णी यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान