बैलांना झुली व शेतकर्यांना मास्क वाटप करून लोहगावे यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा


 बैलांना झुली व शेतकर्यांना मास्क वाटप करून लोहगावे यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा*

===================

मुक्या प्राण्याप्रती अशीही संवेदना

===================

नरसी प्रतिनिधी--

शेख अहेमद --

कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ...यंदा तर संकटच संकट निर्माण झाले.सहा महिन्यापासून कोरोना च्या महामारीने सर्वांना हैराण करून सोडले असताना तळ हाताच्या फोडा सारख्या जपलेल्या मुक्या जनावरावर देखील लंपी स्कीन नावांच्या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून शेकडो जनावरं बाधीत झाल्याने शेतक-यांच्या मदतीला हात देत देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा सप्ताह च्या माध्यमातून सहा दिवस माणिकराव लोहगावे यांनी शेतक-यांच्या मदतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासली असे गौरउदगार भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राम पाटील रातोळीकर यांनी व्यक्त केले.

दि.२१ सप्टेंबर रोजी नायगाव तालुक्यातील रातोळी येथे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त आ.राम पाटील रातोळीकर यांच्या हस्ते व जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे यांच्या वतीने जनावरांना आजार होऊ नये या सुरक्षेसाठी विशिष्ट पद्धतीने बनवलेले सुरक्षा कवच ( झुल) बैलांना पांघरून तसेच शेतकऱ्यांना  मास्क व रोग प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी होमिओपॅथी आर्सेनिक अल्बम औषध वाटप करुन आगळा वेगळा पध्दतीने वाढ दिवस साजरा केला. कोरोणा महामारीशी संपूर्ण देश आज तोंड देत असताना. आज प्राण्यावर पण करोना सारखाच लंबी स्किन डिसीज हा आजार आला असून या आजाराचा सामना करण्यासाठी लोहगावे यांच्या कल्पकतेतून आहेर म्हणून दिल्या जाणाऱ्या साड्या व सत्कार सोहळ्यात दिल्या जाणाऱ्या शाली यापासून विशिष्ट रचनेत झूली तयार करण्यात आल्या. यामुळे प्राण्यावर बसणारे मच्छर, माशी यापासून संरक्षण होऊ स्किन आजार हा फैलणार नाही या साठी ते उपयुक्त ठरेल. तसेच जनावारांचे संगोपन करणार्या शेतकर्यांना या आजाराबदल सविस्तर असे मार्गदर्शंन डाँ. साळवे यांनी केले. या कार्यक्रमाला तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. साळवे, डॉ. विनायक हांडेबाग ,जनार्दन पाटील ,सोपान पाटील ,नंदू पाटील, डॉ.शिवसान चिद्रे, गोविंदराव तुपेकर, मारुती भास्करे ,श्रीराम शिरगिरे ,नामदेव वजीरगावे, परमेश्वर पाटील जाधव ,राजू इरेवाड, शिवाजी कोकणे, माधव मेहेत्रे, पिराजी देशमुख ,गजानन पाटील ,विजयचंद पाटील ,गोविंद पाटील, राहुल माली पाटील ,चींचे साहेब, पत्रकार सुभाष पेरकेवार , पत्रकार गोविंदराव नरसीकर ,नामदेव यरकटवार आदि उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान