कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जनतेनी अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये :- मनसे नेते शंकर लोखंडे
कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जनतेनी अत्यावश्यक कामाशिवाय घरा बाहेर पडू नये :- मनसे नेते शंकर लोखंडे
मनसे नेते शंकर लोखंडे यांनी केले मुखेड वासियाना आवाहन
मुखेड प्रतिनिधी / बल्खी आसद
कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात हलकल्लोळ उडवून दिला आसुन मुखेड शहराह सह ग्रामीण भागात सुद्धा या विषाणूचा प्रमाण वाढत चालेला आहे .
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आपल्या गावात दिवसेंदिवस वाढतच असल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन
मुखेड वासियांनी या विषाणूचा प्रादुर्भावापासुन बचाव करण्यासाठी आरोग्य प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर न पडता व गर्दीच्या ठिकाणी न जमता आपापल्या घरात राहुन आपली व आपल्या कुटुंबांची काळजी स्वत:च घ्यावी व न.पा च्या वतीने घरोघरी निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात यावे.
कोविड -१ ९ साठी सध्या अधिकृतपणे मंजूर असे औषध नाही . या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये असलेली लक्षणे दूर करण्यासाठी विश्रांती , द्रवरूप आहार आणि तापाचे नियंत्रण यासारखी सहायक काळजी घ्यावी . खोकला शमवणारी औषधे , ताप नियंत्रित करणारी औषधे , विश्रांती देणारी औषधे अशी रोग्याच्या लक्षणांप्रमाणे आवश्यक वाटणारी नेहमीची औषधे देण्यात येतात .
मग कोरोना विषाणू पासुन बचाव कसा करायचा
1 आपले हात साबणाने आणि पाण्याने कमीतकमी १५-२० सेकंद धुवा . जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल , तर कमीतकमी ६० % अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा .
2 आपले डोळे , नाक आणि तोंड यांना न धुतलेल्या हातांनी स्पर्श करणे टाळा . आजारी असलेल्या लोकांशी जवळचा १ मीटरच्या आतला संपर्क टाळा .
3 आपण स्वत : च आजारी असलात तर घरीच राहा .
4 खोकताना किंवा शिंकताना रुमालाने , टिश्यूने तोंड झाकून मग तो टिश्यू कचरापेटीत टाका . त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावा .
5 वारंवार स्पर्श केल्या जाणा - या वस्तू आणि पृष्ठभाग यांची स्वच्छता आणि नेहमीचे घरगुती क्लिन्झर वापरून निर्जंतुकीकरण करणे हा प्रभावी मार्ग आहे .
6 सध्या फ्लू आणि श्वसन रोगाचा हंगाम आहे आणि सूक्ष्मजंतूंचा प्रसार रोखण्यासाठी नियमित प्रतिबंधक कृती करणे योग्य ठरेल तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेली असल्यास ती औषधे घेत राहायला पाहिजेत .
कोरोणा संक्रमित होण्यापासून रोखण्यासाठी आरोग्य प्रशासनाला सहकार्य करावे असे ही आवाहन मनसे नेते शंकर लोखंडे यांनी संपूर्ण तालुका वासियाना केले आहे.

Comments
Post a Comment