मुस्लिमांना शिक्षण , नोकरीमध्ये आरक्षण देण्याची मागणी :- अदनान पाशा मित्रमंडळ
मुस्लिमांना शिक्षण , नोकरीमध्ये आरक्षण देण्याची मागणी
मुखेड प्रतिनिधि : बल्खी आसद
महाराष्ट्रात मुस्लिम समाज राजकीय , शैक्षणिक व आर्थिक या बाबीमध्ये मागासलेला आहे. मुस्लिम समाजाला सरकारने संविधानानुसार नोकरी व शिक्षणामध्ये १० % आरक्षण देण्यात यावे अशा मागणीचे निवेदन
अदनान पाशा मित्रमंडळाच्या वतीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे .
सच्चर समिती , रंगनाथन मिश्रा व महेमुद उर रहमान समिती यांनी सखोल अभ्यास करून आपआपले अहवाल सादर केलेले आहेत . मुस्लिम समाजास १० % आरक्षण मिळावे असे स्पष्ट केलेले आहे . मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची कायदेशीर बाबी भक्कम असून महाराष्ट्र शासनाने त्वरित कायदा करून भेदभाव न करता योग्य पाठपुरावा करावा . राज्यघटनेतील कलम १५ ( ४ ) व १६ ( ४ ) या मध्ये अनुक्रमे शिक्षण व सहकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद केली आहे , पण मागील सरकारने ज्या आधारावर मुस्लिम आरक्षण नाकारले तो आधार पूर्णपणे चुकीचा आहे. मुस्लिम आरक्षण मागणीचे निवेदन मुखेड येथील तहसीलदारांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. या निवेदनावर अदनान पाशा, अनिकेत कांबळे, अफरोज चौधरी, विशाल बनसोडे, समीर शेख, हसन कुरेशी, इंजी.अतिक होनवडजकर, हाफिज सरवरसाब, हाफिज हुजेफा, अश्फाक मणियार, सय्यद अनवर, समीर अत्तार, अमोल सोनकांबळे, अमोल बनसोडे, सतिष कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments
Post a Comment