सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या. विहीरीत उडी मारुन संपवीला आपला संसार मुखेड प्रतिनिधी :- दिसायला काळी आहेस , लग्नात मानपान केला नाही म्हणून माहेराहून एक लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी मानसिक व शारीरिक छळ करून या होणाऱ्या त्रासाला कंटाळून मुखेड तालुक्यातील मौजे कबनूर येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली . या प्रकरणात सासरच्या आठजणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे . कबनूर हे सासर असलेल्या श्रीदेवी संभाजी पांचाळ या विवाहितेला सासरच्या मंडळीकडून पैशाची मागणी करण्यात येत होती ; परंतु माहेरची परिस्थिती बेताची असल्यामुळे श्रीदेवी या पैसे आणण्यास असमर्थ होत्या . मागणी पूर्ण होत नसल्याने सासरच्या मंडळींकडून दिला जाणारा त्रास वाढला होता . त्यामुळे निराश झालेल्या श्रीदेवी यांनी १७ मे रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती . या प्रकरणात शिवाजी गंगाधर पांचाळ यांच्या तक्रारीवरून संभाजी नागनाथ पांचाळ , चंद्रकला नागनाथ पांचाळ , बालाजी पांचाळ , महानंदा पांचाळ , सुनंदा पांचाळ , मीना पांचाळ आणि आनंद पांचाळ यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ...