लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार :- आरोपीस अटक
लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला वारंवार अत्याचार :- आरोपीस अटक
मुखेड तालुक्यातील शेळकेवाडी येथील अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी मुखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला . आरोपीस अटक करून नांदेड येथील बालकारागृहात रवानगी करण्यात आली . शेळकेवाडी येथे राहत असलेल्या अल्पवयीन मुलीच्या घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलाने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार जबरदस्तीने जबरी अत्याचार केला
अचानक चकर येऊन पडली व् उलटया झाल्याने तिच्या आई पालकांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले . मुलीने घडलेली हकीकत आई वडिलांना संगितल्याने आरोपी विरोधात मुखेड पोलिसांत गु.र न १३६/२०२१ ३७६ ३७६ (N) भादवि ४,१२ बालकाचे लैंगिक अत्याचार पासुन संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला . पुढील तपास पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रकाश कुंभारे हे करीत आहेत .

Comments
Post a Comment