मुखेड तालुक्यात अवकाळी पावसासह वीज पडुन एक शेतकरी व तीन म्हशीचा मृत्यु

 मुखेड तालुक्यात अवकाळी पावसासह वीज पडुन एक शेतकरी व तीन म्हशीचा मृत्यु



 

मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद

गेल्या सात दिवसापासून पडणाऱ्या अवकाळी पावसाने शुक्रवारी ( ता . 7 ) रोजी कहरच केला . मुखेड  तालुक्यातील शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला . यात तुपदाळ खु . येथील रमेश पंढरीनाथ दोमाटे ( ५५ ) या अल्पभूधारक शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाला . तर वडगाव येथील धुरपतबाई कांबळे , चव्हाणवाडी येथील अशोक जाधव तर थोटवाडी येथील शंकर पांचाळ यांच्या म्हशीवर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या .गावात विज पडून तीन जनावर दगावली असून हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर बेतला आहे . गेल्या पंधरा दिवसापासून तालुक्यात अधूनमधून अवकाळी पाऊस पडत असून यामुळे शेतकऱ्यांचे आंबा या फळपीकाचे मोठे नुकसान झाले आहे . दररोज पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतकरीही वैतागला असून शेतातील मेहनत करणे अवघड झाले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले आहे . हा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांच्या जिवावर बेतला आहे .

 मृत शेतकरी रमेश दोमाटे यांच्या पश्चात पत्नी , एक मुलगा , दोन विवाहित मुली व एक अविवाहित मुलगी असा परिवार आहे . त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे .


Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान