"म्युकर" "मायकोसिसचे" रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच :- डॉ तौसिफ परदेसी

 "म्युकर" "मायकोसिसचे" रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच :- डॉ तौसिफ परदेसी
  

आरोग्य प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज

*गरज नसताना मास्क चा अती वापर टाळावा 

*एकच मास्क सतत वापरत असाल तर तो स्वच्छ धुवून वापरावा किव्हा बदल करा

देशात गेल्या तीन-चार दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत असलं तरी रुग्णवाढ आणि मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. त्यातच म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशी (Black Fungus Mucormycosis) या आजाराने देशासह राज्यात शिरकाव केलाय. कोरोनो संकट काळात दिवसागणिक गंभीर होत असताना पोस्ट कोविंड अन्य आजार बळावत असल्याचे स्पष्ट झाले असून कोरोनोनातून बरे होऊन बाहेर आल्यानंतर आता धोकादायक ठरत असलेल्या म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळत असल्याने आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याचे गरजेचे बनले असून मुखेड तालुक्यात म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळून आले आहेत काही  म्युकर मायकोसिसचे रुग्णांसाठी योग्य उपाय योजना साठी आरोग्य विभागाने सतर्क करण्याची गरज निर्माण झाली असून डॉक्टरांच्या सल्ल्याने म्युकर मायकोसिसचे रुग्णांनी वेळेवर उपचार घेणे गरजेच असल्याचे डॉ तौसिफ परदेसी यांनी  जनतेला आवाहन केले आहे.
  पुढे बोलताना म्हणाले डॉक्टर  परदेसी कोरोनोतुन बरे झालेल्या रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या
ठराविक रुग्णांना म्युकर मायकोसिसचे बुरशीजन्य आजाराची लागण अनेक उदाहरणे आढळली आहेत.
 कोरोनोबाधीतावर उपचार करताना उपचार करताना ठराविक वेळेस अतिरिक्त स्टेरॉईड दिलेल्या रुग्णांमध्ये हा काळी बुरशीजन्य आजार बळावतो. मुळात मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना याचा मोठा धोका जाणवतो. अशा प्रकारचा धोका अनेक रुग्णांमध्ये आढळल्यानंतर योग्य वेळी उपचार करणे गरजेचे आहे  मुखेड तालुक्यात पाच  रुग्ण आढळल्याने त्या पैकी ४ जनाचा मृत्यु झाल्याचा समजले आहे  कोरोनो झालेल्या रुग्णांमध्ये दंत व मुख रोग डोळ्याचे आजार वाढल्याचे दिसून येत आहे तसेच हा आजार मेंदू पण वाढत आहे. त्यांनी विशेष काळजी घ्यावी पूर्वी   कोरोनो ची लागण झाली असल्यास त्याची माहिती तुमच्या डॉक्टर पासून लपवू नका जेणेकरून पुढील अनर्थ टाळेल नागरिकांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. विनाकारण बाहेर पडू नका. तोंडाला मास्क लावलाच पाहिजे असे सांगून सर्वांनी मिळून कोरोणाला हरवूया असे डॉ तौसिफ परदेसी यांनी सांगितले.

सर्वाधिक धोका कोणाला?

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या म्हणण्यानुसार, कोरोना रूग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो. अनियंत्रित मधुमेह, स्टिरॉइड्समुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ आयसीयू किंवा हॉस्पिटलमध्ये अॅडमिट राहणे, इतर कोणताही रोग, पोस्ट प्रत्यारोपण (ऑर्गेन ट्रान्सप्लांट) किंवा कर्करोग झाल्यास काळ्या बुरशीचा धोका वाढू शकतो.

काळ्या बुरशीची लक्षणे

काळ्या बुरशीमध्ये बर्‍याच प्रकारची लक्षणे दिसतात. डोळे लाल होणं किंवा डोळे आणि आसपास वेदना होणे, ताप, डोकेदुखी, खोकला, श्वास घेताना त्रास होणे, उलट्या होणे आणि त्यावाटे रक्त पडणं किंवा मानसिक स्थितीत बदल होणे ही काळ्या बुरशीची प्रमुख लक्षणे आहेत.

बचाव कसा करायचा?

काळ्या बुरशीपासून बचाव करण्यासाठी धुळीच्या ठिकाणी मास्क घाला. माती किंवा खत यांसारख्या गोष्टींच्या संपर्कात येत असाल तर शूज, ग्लोव्हज, फुल स्लीव्ह शर्ट आणि ट्राऊझर घाला. स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. मधुमेहावर नियंत्रण मिळवा, इम्यूनोमोड्युलेटिंग औषधे किंवा स्टिरॉइड्सचा वापर टाळा

तसेच कोरोनातून बरे झाल्यानंतर रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर लक्ष ठेवा. केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच स्टिरॉइड्स वापरा. ऑक्सिजन थेरपीच्या वेळी, ह्यूमिडिटीफायरसाठी फक्त स्वच्छ पाणी वापरा. आवश्यकतेनुसार अँटीबायोटिक्स किंवा अँटीफंगल औषधे वापरली पाहिजेत.

काय करु नये?

काळ्या बुरशीपासून संरक्षणासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तिच्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. नाक बंद असेल तर सायनस किंवा तत्सम सर्दीसारखा आजार आहे, असं समजण्याची चूक करु नका. खास करुन कोविड-19 आणि इम्यूनोसप्रेशनमध्ये अशी चूक करु नका.

 

 

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान