कोरोना काळात बेटमोगरा येथील ग्रामसेवक कर्तव्यापासून होम कॉरटाईन
कोरोना काळात बेटमोगरा येथील ग्रामसेवक कर्तव्यापासून होम कॉरटाईन
तब्बल महिनाभरापासून ग्रामसेवकाची गैरहजेरी !
बेटमोगरा प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
कोरोना महामारीच्या संकटकाळी परिस्थितीत तालुक्यातील बेटमोगरा सज्जा येथील ग्रामसेवकाची ग्रामस्थांना सतत "Out of coverage area" ची लस देऊन तब्बल एक महिन्यापासून बेटमोगरा ग्रामपंचायतीच्या कामकाज व कर्तव्यापासून कोसो दुर होम कॉरटाईन असल्याने येथील नागरिकांत नाराजी पसरलल्याचे दिसून येत आहे.
ग्रामसेवकाला ग्रामपंचायतीच्या सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी या नावाने ओळखले जाते.मात्र तालुक्यातील बेटमोगरा सज्जा येथील ग्रामसेवक हे गेल्या महिनाभरापासून ग्रामपंचायत कार्यालयात गैरहजर असल्याने येथील नागरिकांची अनेक कामे खोळंबली आहेत.तसेच कोरोना महामारीच्या काळातही गावात कोरोना जनजागृती निर्माण करने गरजेचे असताना देखील गावात कोणतीही उपाययोजना राबविण्यात आली नसल्याने ग्रामसेवकावर सरपंच,ग्रा.पं.सदस्य व ग्रामस्थांमध्ये तिव्र संतापाची लाट उसळली आहे.
देशात सद्यस्थितीत कोरोनाची दुसरी लाट उसळली असून त्यासह बेटमोगरा येथे सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर उपाययोजना म्हणून गावात दर दोन ते तीन आठवड्यात जंतुनाशक फवारणी करणे,परिसरात स्वच्छतेचे पालन करणे, विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्वरत करणे,गावामध्ये कोरोना विषयी जनजागृती निर्माण करणे अशा बिकट परिस्थितीमध्ये गावात नियंत्रण ठेवण्यासाठी ग्रामसेवकाची प्रमुख जबाबदारी असते.मात्र अशा जबाबदारी व कर्तव्यापासून शासनाच्या नियमांचे सर्रास पणे उल्लंघन करून ग्रामसेवक सतत बेटमोगरा ग्रा.पं. कार्यालयात गैरहजर राहत असुन ग्रामस्थांनी कामासाठी वेळोवेळी फोन केला असता कधी फोन बंद,तर कधी बिझी तर कधी दुसऱ्यालाच फोन देऊन हात झळकणाऱ्या संबंधित बेजबाबदार ग्रामसेवकाची त्वरित येथून हाकालपट्टी करण्यात यावी असे गावातील जेष्ठ नागरिक व ग्रामस्थांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे.

Comments
Post a Comment