मुखेड येथे क्रांतिसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी
मुखेड येथे क्रांतिसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली
मुखेड प्रतिनिधी :-
लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा बसवण्णा यांचा जन्म दिवस वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती म्हणून साजरा केला जातो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. यंदा ही बसवेश्वर जयंती आज 14 मे दिवशी आहे. महात्मा बसवण्णांनी समाज व्यवस्था परिवर्तन करण्यामध्ये मोठे योगदान दिले आहे.
दानधर्मापेक्षा दासोह महत्त्वाचा आहे. शिक्षण घ्या, वचने लिहा, वाचनसाहित्य वाचा. ज्ञानी व्हा, नैतिक बना, विवेकी बना, स्वतःमध्ये बदल करा. स्वतामधील दोष दूर करा. कर्मकांड दूर करा. स्वतःची स्तुती करू नका अशी सहज साधी सोपी वाटणारी पण माणसाला घडवणारी बहुमोलाची शिकवण बसवेश्वरांनी दिली आहे. आजही त्यांचे अनुयायी याचे पालन करतात.
त्यामुळे मुखेड येथे क्रांतिसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साजरी करण्यात आली उपस्थित मा. बालाजी आण्णा बंडे, मा. सुनिल पाटील,शरद कोरे, ओम धानोरकर, सुनिल पा.आरगिळे,सागर पाटील,शिवकुमार बंडे, सतीश पाटील, शरद पाटील व इतर बांधव

Comments
Post a Comment