मुखेड येथे मराठा समाजाच्या युवकांनी केले केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..
मुखेड येथे मराठा समाजाच्या युवकांनी केले केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन..
मुखेड प्रतिनिधि :- बल्खी आसद
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा दिलेला निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला आहे. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.आहे या निर्णयाने संपूर्ण महारष्ट्रात केंद्र व राज्य सरकारवर नाराजगी व्यक्त केली गेली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना ते टिकवण्याची जबाबदारी हि राज्य सरकारची असताना सरकार मात्र यावरती सरकारचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते . सरकारला मराठा आरक्षणाची काहीच काळजी नसून मराठा समाजाच्या तोंडाला नेहमीच पाने पुसण्याचे कामे केले आहे . आज सर्वोच्च न्यायालयाने सर्व शिक्षण क्षेत्रात नाकारण्याचे आदेश देत आहे . यामुळे सकल मराठा समाजात संतापाची लाट पसरली असून ह्याची सुरुवात हि मुखेड तालुक्यातुन झालेली आहे .सर्वोच्च न्यायालयाने काल मराठा समाजाच्या आरक्षणास रद्द केल्याने मुखेड तालुक्यातील मराठा समाजाच्या युवकांनी केंद्र व राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध नोंदवत मुखेड चे तहसीलदार श्री काशिनाथ पाटील यांच्याकडे निवेदन देऊन संविधानिक मार्गाने सरकारकडे निषेध नोंदविण्यात आला आहे. यावेळी शिव शंकर पाटील कलंबरकर, सचिन पाटील इंगोले, गिरीधर पाटील केरूरकर, गोपाल पाटील जाहूरकर, आकाश पाटील केरूरकर, विनायक पाटील माहेगावकर, प्रदीप पाटील हसनाळकर, बालाजी पाटील वडजे, सुमित इंगोले, चंद्रकांत वडजे, तानाजी इंगोले, प्रशांत पाटील, धनाजी इंगोले, सतीश शिंदे यांच्यासह असंख्य मराठा समाज बांधव उपस्थित होते

Comments
Post a Comment