मुखेड शहरात लोकांना बनावट ई-पास बनऊन देणारे गजाआड
मुखेड शहरात लोकांना बनावट प्रवास ई-पास बनऊन देणारे गजाआड
मुखेड प्रतिनिधी :- बल्खी आसद
मुखेड शहरातील शिवाजीनगर कमानी समोरील न्यु साईराम डोरॉक्स अँन्ड मल्टीसहिसेस येथे छापा मारुन दुकानातील संगणकाची पाहणी केली असता सोमेश प्रल्हादराव ढेपाळे वय २७ वर्ष , व्यवसाय डाटा इंट्री ऑपरेटर रा.राजेश बार समोर मुखेड याने संगणक साहित्याचा वापर करुन बनावट ई पास तयार केल्याचे आढळुन आले . त्यावरुन सदर दुकानाचे मालक सोमेश प्रल्हादराव ढेपाळे वय २७ वर्ष , व्यवसाय डाटा इंट्री ऑपरेटर रा.राजेश बार समोर मुखेड यांना ताब्यात घेऊन अधिक विचारपुस केली असता त्यांनी बनावट ई पास तयार केल्याचे कबुल केले . तसेच त्याचा मित्र प्रताप सुदामराव सुडके , वय ३३ वर्ष , व्यवसाय झेरॉक्स सेंटर चालक , रा.अशोकनगर मुखेड यांनी देखील त्यास बनावट ई पास बनवुन दिल्याचे सांगीतले . त्यावरुन प्रताप सुडके यांचे योगेश झेरॉक्स सेंटर या दुकानात छापा मारुन तेथील संगणकाची पाहणी केली असता प्रताप सुदामराव सुडके याने देखील संगणक साहित्याचा वापर करुन बनावट ई पास तयार केल्याचे मिळुन आले . त्यावरुन दोन्ही दुकानदारांना ताब्यात घेऊन त्यांचेकडील गुन्हयामध्ये वापरलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य ०२ सीपीयु , ०२ मॉनिटर , ०२ किबोर्ड , ०२ माऊस , संगणक जोडणीसाठी लागणारे केबल , ०२ मोबाईल असा एकुण २८३५० / - रुपयाचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आलेले असुन आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे . सदरची कार्यवाही ही मा.प्रमोद शेवाळे , पोलीस अधिक्षक साहेब , नांदेड , मा.सचिन सांगळे , उप विभागीय पोलीस अधिकारी , उप देगलुर यांचे मार्गदर्शनाखाली विलास गोबाडे , पोलीस निरीक्षक , पोउपनि गजानन काळे , पोउपनि गणेश चित्ते , पोना / १३०६ पाळेकर , पोना / १२८० दत्तापल्ले , पोकॉ / २७८ आडबे , पोकॉ / २६४० किरण वाघमारे यांचे पथकाने केली असुन पोउपनि जी.डी.चित्ते यांनी दिलेल्या तक्रारी वरुन पो.स्टे.मुखेड येथे गुरनं . १२७/२०२१ कलम ४२०,४६५,४६८,३४ भादंवि व सहकलम ६६ ( ड ) आयटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे , पो.स्टे.मुखेड हे करीत आहेत अशी माहिती मुखेड पोलीस स्टेशनने प्रेस नोट द्वारे देण्यात आली आहे
-------------------चौकट-----------------------
अशा प्रकारचे बनावट प्रवास ई-पास कडून देणाऱ्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल पो.नि विलास गोबाडे

Comments
Post a Comment