मुक्रमाबाद ता मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे : ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफची मागणी

 
 मुक्रमाबाद ता मुखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावे : ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफची मागणी
 मुखेड :- आसद बल्खी

मुक्रमाबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी आज ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफच्या वतीने तहसीलदारांना  निवेदन देण्यात आले आहे.
आरोग्य म्हणजे केवळ व्याधी किवा विकलांगता याचा अभाव नव्हे, तर संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य अशी जागतिक आरोग्य संघटनेची आरोग्य विषयक संकल्पना आहे. ‘‘सर्वासाठी आरोग्य‘‘ हे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्याची बांधीलकी राज्य शसनाने स्विकारली असून त्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रतिबंधक, प्रवर्तक, उपचारात्मक आणि पुनर्वसनात्मक आरोग्य सेवा जनतेला पुरविणेकरीता आरोग्य विषयक सुविधांचे जाळे उभारणेसाठी राज्य शासनाकडून प्रयत्न करणेत येत आहे. राज्याच्या कानाकोप-यामध्ये ग्रामीण जनतेला आरोग्य विषयक सुविध पोहचविणेसाठी ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांची स्थापना करणेत आली आहे.परंतु  मुकमाबाद येथे लाखो रूपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची भव्य इमारत बांधण्यात आली या इमारतीला 3 वर्ष पूर्ण झाले असून तथापी सदर रूग्णालयात वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कोणताही कर्मचारी स्टॉफ उपलब्ध झालेला नाही . व रूग्ण समिती स्थापण देखील कण्यात आलेली नाही . शासनाच्या या दिरंगाईमुळे रूग्णालयात नासधुस तसेच तेथील हवेचे पंखे चोरीस गेलेले आहेत . किचेन वट्टे , दार , खिडक्या व टाईल्स तोडफोड झालेले अवस्थेत दिसत आहेत . सदर बाब लोकहितासाठी गंभीर स्वरूपाची आहे . या ठिकाणी कोवीड केअर सेंटर चालू झाल्यास परिसरातील रूग्णांना एक मोठी सहायता मिळेल . या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती विषयी वारंवार मागणी करून देखील अशा भयावह परिस्थीत देखील शासन याकडे लक्ष देत नाही . इतक्या मोठया प्रमाणात शासन खर्च करून देखील आरोग्य इमारतीचा योग्य वापर होत नाही . छोटया मोठया अजारासाठी मुकमाबाद परिसरातील रूग्णांची हेळसांड होत आहे . सध्या कोवीड -19 चा संसर्ग फार मोठया प्रमाणात होत असल्याने ही इमारत चालू होणे अत्यंत गरजेचे आहे . तरी मुकमाबाद येथील नवीन इमारत चालू करून परिसरातील नागरीकांना सोईसुविधा उपलब्ध करूनद्यावी अशी विनंती ऑल इंडिया तन्ज़ीम ए इन्साफ चे मुक्रमाबाद शहर अध्यक्ष जलील पठान यांनी तहसीलदार याना पत्रा द्वारे केली आहे यावेळी उपस्तित शहर अध्यक्ष जलील पठान ,बबलु  मुल्ला,शादुल होनवड़जकर,आसद बल्खी,रामदास पाटिल माळेगावे आदि

Comments

Popular posts from this blog

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान

शेकाप च्या मागणी नंतर कर्जमाफी योजनेची साईट सुरू.

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहीतीची आत्महत्या.