नांदेड येथे हल्लाबोल मिरवणूकीदरम्यान तुफान दगडफेक, सहा पोलिस गंभीर जखमी
नांदेड येथे हल्लाबोल मिरवणूकीदरम्यान तुफान दगडफेक, एसपींसह अन्य अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या, सहा पोलिस गंभीर जखमी मिरवणूकीस परवानगी नाकारल्याने संतप्त तरुणांनी केली दगडफेक, पोलिसांच्या वाहनांची तोडफोड, शहरात प्रचंड दहशत. नांदेड दि.२९ : शिख समाजात होळी या सणाला मोठे महत्व आहे. त्यानिमित्त शिख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्लाबोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रसार झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लावण्या आले आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्या वतीने कुठल्याही धार्मिक कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही असा आदेश यापूर्वीच काढला होता. मात्र या आदेशाची पायमल्ली करत हल्लाबोल मिरवणुकीतील काही तरुणांनी परवानगी का नाकारली म्हणून चक्क पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. यात सहा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून पोलिस अधीक्षक यांच्या वाहनांसह अन्य वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या गाड्यांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहेत. शहरात या प्रकरणानंतर तणावाचे वातावरण बनले असून हल्लेखोरांची धरपकड सुरु आहे. सध्या शहरात तणावाचे वातावरण बनले असून वजिर...