वाईट दिवस आले की मेहनत करावी आणि चांगले दिवस आले की मदत करावी- डॉ.राहुल कांबळे

 वाईट दिवस आले की  मेहनत करावी आणि चांगले दिवस आले की  मदत करावी- डॉ.राहुल कांबळे


मुखेड:- 

सामाजिक एकता ग्रामविकास मित्र मंडळ मौजे सलगरा खुर्द यांच्यावतीने दिनांक 16 मार्च 2021 रोजी सलगरा खुर्द या गावामध्ये बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीतील धुरंधर व्यक्तिमत्व, महाराष्ट्र राज्य मंत्रालय शासकीय-निमशासकीय पशुचिकित्सक संघटनेचे राज्याध्यक्ष तथा जिल्ह्याचे पशुधन विमा अधिकारी डॉ.राहुल कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत पशुरोग निदान शिबीराचे मौजे सलगरा खुर्द येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये अनेक पशूंना मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये वंध्यत्व निवारण ,गर्भ तपासणी,गोचीड फवारणी व अनेक रोगांवर मोफत उपचार करण्यात आला. या शिबिराला गावातील पशुपालकांनी चांगला प्रतिसाद दिला सध्या कोरोनाच्या काळ सुरू असल्यामुळे प्रशासनाच्या सर्व नियमाचे पालन करून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटक गावातील सरपंच ज्योतीबाई पवार

उपसरपंच गौस अली मामा

गावातील पोलीस पाटील प्रदीप देशमुख सामाजिक कार्यकर्ते सुधाकर सोनकांबळे एकता ग्रामविकास मित्र मंडळाचे सर्व सदस्य इत्यादींच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले

  डॉ.राहुल कांबळे यांचं सलगरा खुर्द हे आजुळ असल्यामुळे त्यांनी तिथे लहानाचे मोठे झाले त्या निमित्ताने आपण काहीतरी समाजाचे देणे आहोत ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतो त्या क्षेत्राच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस दिवस गेल्या दहा वर्षापासून मुखेड तालुक्यांमध्ये सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ते साजरे करतात यावर्षी त्यांनी आपल्या आजुळी सलगर ( खु ) वासियांना मोफत पशुरोग निदान शिबिर घेतल्याबद्दल गावातील सर्व पशूपालक यांचे  स्वागत करण्यात आले .अशा  या कोरोना च्या काळामध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याला एक मायेचा पदर टाकण्याचा एक छोटासा प्रयत्न मना सारखा राजा एक दिलखुलास व्यक्तिमत्व सामाजिक चळवळीत स्वताला झोकून देणार माणसातला देवदूत  डॉ.राहुल कांबळे यांनी मानवाच्या हितासाठी हाती घेतलेलं कार्य त्यामाध्यमातून शोषित पीडित वंचित लोकांना या शिबिराच्या माध्यमातून एक छोटासा दिलासा देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झालेला आहे.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना बेटमोगरा येथील

डॉ.देवधरे दवाखान्याचे कर्मचारी केदार, रिटायर कर्मचारी विठ्ठल मामा, बालाजी ताळीकोटे इत्यादींनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले .

एकता ग्राम विकास मित्र मंडळाचे सदस्य देवबा नागोराव सोनकांबळे,यशवंत घायाळे , रंजीत पाटील डांगे,फारुक शेख,रामा गोणारे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मुखेड तालुकाध्यक्ष पत्रकार भारत सोनकांबळे बेटमोगरेकर इत्यादींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती .

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान