डॉ संदीप रायसोनी यांना राज्यस्तरीय आरोग्य भूषण नागरी पुरस्कार जाहीर

 डॉ संदीप रायसोनी यांना राज्यस्तरीय आरोग्य भूषण नागरी पुरस्कार जाहीर 


मुखेड/ प्रतिनिधी 

नांदेड येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ संदीप शांतीलाल रायसोनी याच्या वैद्यकीय क्षेत्रातील उच्च कामगिरी आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान ची दखल घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र च्या वतीने राज्यस्तरीय आरोग्यभूषण नागरी पुरस्कार 2021 त्याना नुकताच जाहीर झाला आहे पुरस्कार जाहिर झाल्यानंतर  विविध क्षेत्रातील मान्यवर कडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे 

नांदेड येथील  बालरोगतज्ज्ञ डॉ संदीप रायसोनी आणि त्यांचंय पत्नी स्त्रीरोग तज्ञ सौ भाग्यश्री रायसोनी या दाम्पत्याने मागील वीस वर्षांत  वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक बांधलकीतून रुग्ण सेवा  केली आहे कोव्हिडं प्रसार काळात त्यांनी अखंडपणे रुग्णना आरोग्यसेवा दिली आहे 

सामजिक क्षेत्रात त्यानी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र संस्थेच्या पुरस्कार निवड समितीने त्याची राज्यस्तरीय आरोग्यभूषण नागरी पुरस्कार 2021 जाहीर केला आहे 

हा पुरसकार सोहळा चे वितरण सपत्नीक  दि 07 रोजी रविवारी शीर्डी जी अहमदनगर येथील साई सिल्वर ओक लान्स वॉटर पार्क येथे होणार आहे यावेळी  माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत याच्या हस्ते पुरस्कार वितरण होत असून , प्रमुख अतिथी म्हणून प्रवीणदादा गायकवाड, अध्यक्ष मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, आ डॉ सुधीर तांबे ( पदवीधर मतदार संघ नाशिक,) आ निलेश लंके, पारनेर, प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार  आहेत 

शाल श्रीफळ सन्मानपत्र मानचिन्ह असे पुरस्कार स्वरूप आहे 

डॉ संदीप रायसोनी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुखेड येथील सर्पदंश तज्ञ डॉ दिलीप पुंडे, आय एम ए चे अध्यक्ष डॉ वेंकट सुभेदार भोसले , 

डॉ अशोक कौरवार डॉ माधवी सुभेदार, डॉ माधव पाटील उचेकर, डॉ रामराव श्रीरामे, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ऍड संदिप कामशेट्टे

 यांनी अभिनंदन केले आहे सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान