नांदेड शहरासह जिल्ह्यात १२ ते २१ मार्च अंशत: लॉकडाऊन, अत्यावश्‍यक सेवा राहणार सुरू…

 नांदेड शहरासह जिल्ह्यात १२ ते २१ मार्च अंशत: लॉकडाऊन, अत्यावश्‍यक सेवा राहणार सुरू…    


                              नांदेड :- गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण याला लोकांनी पाहिजे तसा प्रतिसाद द्यावा. परिणामी शहरात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वाढली. त्यामुळे आता १२ ते २१ मार्चपर्यंत अंशत:  लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. विपीन इटणकर यांनी प्रसिध्दी पत्राद्वारे कळविले आहे. या लॉकडाऊनदरम्यान शहरातील आठवडी बाजार, कोचींग क्लासेस, धार्मीक, सामाजीक व राजकिय कार्यक्रम पुर्णत: बंद राहणार. अनेक कार्यालयांमध्ये मार्च एन्डींगची कामे सुरु आहेत. त्यामुळे ही कार्यालये पूर्णतः बंद करता येणार नाहीत. माध्यम प्रतिनिधींना ओळखपत्र बाळगून शहरात वावर करता येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात दारु विक्रीची दुकाने सकाळी सात ते रात्री आठपर्यंत तर किचन व होमडीलीव्हीरी सुरु राहणार. या काळात लसीकरण सुरु राहणार आहे. लसीकरणासाठी काही सेंटर शहर आणि जिल्ह्यात आहेत. नांदेड शहर आणि जिल्ह्यातील खासदार, आमदार, नगसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सर्व लोकप्रतिनिधींनी लसीकरणासाठी योगदान द्यावे. लसीकरणासाठी लोकांना जाण्यायेण्यासाठी व्यवस्था करावी. जेणेकरुन लोक केवळ लसीकरण केंद्रावर येतील आणि तेथूनच घरी परत जातील आणि शहरात इतरत्र फिरु शकणार नाहीत. भाजीपाला, किराणा दुकाने, डोळ्यांचे दवाखाने, चष्म्यांची दुकाने, मटण, मासे, चिकन, अंडी विक्रीची दुकाने सकाळई सात ते सायंकाळी सात पर्यंत सुरु राहतील. विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर अंकुश ठेवण्यासाठी वायुवेग पथक निर्माण करण्यात आले आहेत. 

नांदेड शहरासह सह काही ग्रामिण भागात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर पूर्णतः बंदी राहील. विनामास्क फिरणाऱ्यांवरही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. कठोरपणे १५ ते २१ मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दिवसांत रुग्णांची संख्या कमी झाली, तर लॉकडाऊन उठवू. नाही तर पुढेही वाढवण्याचा निर्णय घेण्यात येईल.

गृहविलगीकरणात पाठवलेले लोक आपल्या घरात न राहता फिरताना आढळले तर त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. ज्यांच्या घरी राहण्याची सोय नाही, त्यांनाही क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठवण्यात येईल. प्रत्येक घरी भाजीपाला, किराणा, दूध दररोज लागते. या गरजांची पूर्तता करण्यात येईल. पण लोकांना मुक्तपणे फिरण्यावर पूर्णपणे निर्बंध राहतील. पोलिस आणि मनपाला तशा सूचना दिल्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान