मुक्रमाबाद येथे मुस्लीम स्मशान भुमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेची मागणी
मुक्रमाबाद येथे मुस्लीम स्मशान भुमीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेची मागणी
स्वतंत्र काळापासुन सोईसुविधेपासुन वंचित
मुक्रमाबाद प्रतिनिधी :-
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद येथे ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेच्या वतिने मुस्लीम स्मशान भुमीसाठी आज दि.१० मार्च रोजी मागणी करण्यात आली.मुक्रमाबाद येथे जे पुरातन स्मशानभुमी आहे.ति अतिशय लेंडी नदीच्या काठावर असून पावसाळ्यात दफनविधीसाठी जाण्यासाठी कोणत्याच प्रकारची सोईसुविधा नाही.स्वतंत्रकाळापासुन आज प्रयंत स्मशानभुमीच्या बाबतीत स्थानिक प्रशासनाच्या बाबतीत कोणतीची सोईसुविधा करुन देण्यात आली नाही.
मुख्यता याचा विचार केला तर हि स्मशानमुमीची जागा लेंडी प्रधान प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आली आहे.भविष्यात मुस्लीम समाजाला भविष्यात दफनविधीसाठी प्रयायी व्यवस्थाच नाही.आता असलेल्या स्मशानभुमीत दफनविधीसाठी दिवाबत्ती रस्ता होत नसल्याचे प्रशासनामार्फत सांगण्यात येत आहे.याची सुविधा देखील करुन देण्यात आली नाही.अशा अनेक कारणामुळे मुस्लीम स्मशानभुमीसाठी ग्रामपंचायत मार्फत जागा उपलब्ध करुन देण्यासाठी ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ संघटनेच्या च्या वतिने मुक्रमाबाद सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना रितसर निवेदन देवून मागणी करण्यात आली. यावेळी पञकार मझर पठाण,बडेसाब कोतवाल, हे उपस्थित होते तर निवेदनावर ऑल इंडिया तंन्जिम-ए-इंसाफ इंसाफ चे मुक्रमाबाद शहरअध्यक्ष जलील पठाण,उपाध्यक्ष शफी खुरेशी,शेख आसिफ ,असलम पठाण,शेख सोहेल,पटेल जलील,शेख मुस्तफा,मणियार मस्तान,शेख अझर,शेख अब्दुल,तांबोळी मुशरफ,गौस पाशामिया शेख महेबुब यांच्या स्वाक्ष-या आहेत .

Comments
Post a Comment