कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे शेतातील मालाचे होत असलेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार, :-अजिम हिंदुस्तानी

 कोरोना लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचे शेतातील मालाचे होत असलेल्या नुकसानाची भरपाई कोण देणार, :-अजिम हिंदुस्तानी



सध्या संपूर्ण जगासहित महाराष्ट्र राज्य मध्ये सुद्धा कोरोना ने थैमान घातले असून, महाराष्ट्र मध्ये सध्या रुग्ण वाढत असल्याने सरकार व महाराष्ट्र प्रशासनाने लॉकडाऊन लावण्याचे निर्देश दिले व सकाळी 7 ते संध्या काळी 7 वाजे प्रयन्त दुकाने चालू राहतील असा आदेश काढला पण या आदेशात सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सर्व दुकाने चालू राहील व नंतर लॉकडाऊन चे नियम लागू होत आहे,

परंतु या आदेशात ने आठवडी बाजार बंद कारण्याचे आदेश दिले, प्रशासनाला आदेश देतांना हे सुद्धा आठवत नाही की आठवडी बाजार असो की बाकी दुकाने असो,नियम सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यन्तचा आहे,

तरी पण शासनाच्या अधिकाऱ्यांनी लोकडाऊन चा नियम मध्ये आठवडी बाजार टाकून बाजार बंद केल्याने नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचे मेथी,टमाटर, गोभि,वांगे, सर्व भाजी पालेव इतर तरकारी चे नुकसान होत आहे, 

याची जाणीव महाराष्ट्र शासन व, नांदेड जिल्ह्यातील प्रशासनाला नाही का??

एकीकडे उन्हाळा सुरु झाला तर दुसरी कडे ठिबक लावून शेतकरी भाजी पाले व तरकारी  शेतात लावून आपला उधरनिर्वाह करण्याचा प्रयत्न करीत आहे,

ते भाजी पाले फक्त आठवडी बाजार च्या दिवशीच विकतात त्यानंतर किलो, दोन किलो, साठी गावो, गावी, शेतकऱ्यांना टोपला डोक्यावर घेऊन फिरावे लागतेत हिमायतनगर शहरातील आठवडी बाजार बंद केल्याने अनेक शेतकऱ्यांचे मालाचे नुकसान होत आहे. जपून जपून ठेवलेले माल जनावरांना टाकले आहे,

शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची भरपाई नांदेड जिल्हा प्रशासन करणार का???

कायदा सर्वांसाठी सामान असतो आम जनतेवर कायदे लादणे सोपे असते पण स्वतः कायदे पालन करणे खूप कठीण आहे,

जसे लॉकडाऊन लावून तुम्ही शेतकऱ्यांचे नुकसान करीत आहे,तसेच जर सरकारने शासकीय अधिकाऱ्यांची पगारी बंद केली तेव्हा कळेल कि लोक कसे जगतात नुकसान सहन करण्याची क्षमता किती आहे, आम जनतेत, आणि स्वतः शासकीय अधिकाऱ्यांचे पगारी बंद केल्यावर कळेल, आता माझा प्रश्न हे कि लॉकडाऊन चे नियम सर्वांसाठी समान करा आणि जसे लॉकडाऊन लावून  दुकाने व आठवडी बाजार बंद करून जनतेच्या पोटावर लाथ मारली तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे पण पगारी बंद होयायला पाहिजे नसता कायदे वेगळे करू नका माझा आणखीन एक प्रश्न आहे,ते म्हणजे कोरोनाची लस वैक्सीन आल्यानंतर हि लॉकडाऊन लावणे म्हणजे जनतेत वैक्सीन लस बद्दल शंका निर्माण करण्याचा काम प्रशासन करीत असल्याचे संशय होत आहे.

सध्या आठवडी बाजार बंद करून शेतांऱ्यांचे झालेल्या  आणि होत असल्या नुकसान ची भरपाई कोण करणार?? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे.


 

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान