दूचाकीवरुन सिनेस्टाईल पाठलाग करुन गोळीबार ! मुखेड तालुक्यातील निवळी शिवारातील घटनाः युवक गंभीर जखमी

 दूचाकीवरुन सिनेस्टाईल पाठलाग करुन गोळीबार ! 

मुखेड तालुक्यातील निवळी शिवारातील घटनाः युवक गंभीर जखमी


मुखेड प्रतिनिधि :- 

मोटरसायकलने सिनेस्टाईल पाठलाग करून अज्ञात व्यक्तीने निवळी येथिल ३१ वर्षीय युवकावर गोळीबार केला . यात गोळी खांद्याजवळ लागून युवक गंभीर जखमी झाला.सदर घटना आज मंगळवार दि.९ रोजी सकाळी मुखेड तालुक्यातील नांदेड -बिदर या राष्ट्रीय महामार्गावरील बाऱ्हाळी पासुन जवळच असलेल्या निवळी शिवारात  गणपती मंदिराजवळ घडली.शहरानंतर ग्रामीण भागात भर दिवसा झालेल्या या गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे . 

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की , निवळी ता . मुखेड येथिल युवक तिरुपती रानबा पपुलवार हा खाजगी कामानिमित्त आज दि.९ मार्च रोजी सकाळी देगलुर तालुक्यातील करडखेल येथे जाऊन मोटारसायकल एम.एच .२४ ए .पी .३१ ९ ४ ने परत घराकडे येत होता.यावेळी त्याचा अज्ञात व्यक्तीने मोटारसायकलवरून सिनेस्टाईल पाठलाग सुरू केला . नांदेड -बिदर या राष्ट्रीय महामार्गावरील बाऱ्हाळी पासुन जवळच असलेल्या निवळी शिवारात पोहचताच गणपती मंदिराजवळ अज्ञात व्यक्तिने पाठीमागुन गोळी झाडली सदर गोळी तिरुपती पपुलवाड यांच्या पाठीमागे उजव्या खांद्याखाली लागली त्यात तो गंभीर जखमी झाला.विशेष म्हणजे गोळी लागल्यानंतरही त्याने गाडी न थांबवता थेट बाऱ्हाळी येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल झाला . येथे पपुलवाड याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथिल शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे सदरील घटनेचा तपास सुरू असुन याबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही बाऱ्हाळी परिसरात भर दिवसा गोळीबार झाल्याची घटना घडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असुन अशा प्रकारची घटना बाऱ्हाळी परिसरात प्रथमच घडली असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान