रानडुकराची दुचाकीला धडक :- शिवसैनिक ठार.
रानडुकराची दुचाकीला धडक :-शिवसैनिक ठार मुखेड प्रतिनिधि:- संध्याकाळी आपल्या गावाकडे निघालेल्या एका दुचाकीस रानडुकराने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात शिवसेनेचे शाखा प्रमुख मारोती देवकाते वय 50 याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मुखेड तालुक्यातील हिब्बट पाटीजवळ दि. २९ च्या रोजी रात्री ८ च्या सुमारास घडली.या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. मुखेड तालुक्यात सध्या रानडुकराच्या हल्ल्याच्या घटना वाढत आहेत. काल दि. २९ रोजी शिवसेनेचे शाखा प्रमुख मारोती माधव देवकत्ते (वय ५०) राहणार एक्लारा हे मुखेड शहरातील आपली कामे आटोपून गावाकडे निघाले असता, मुखेड - एकलारा मार्गावरील ही हिब्बट पाटीजवळ रात्रीच्या अंधारात मारोती देवकत्ते यांच्या दुचाकीस रानडुकराने जबर धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना रात्री आठच्या सुमारास घडली. मारुती देवकत्ते यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगी, तीन मुलं असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित मृत्यूची नोंद मुखेड पोलीस स्टेशनात करण्यात आली आहे. त्यांच्या दुखद निधनाबद्दल मा.आ.सुभ...