मुखेड तहसील कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनचा विविध मागण्यांच्या घोषणांनी मुखेड शहर दुमदुमले

 मुखेड तहसील कार्यालयावर लाल बावटा शेतमजूर युनियनचा रोहयो , घरकुल प्रश्नावर धडक मोर्चा दिल्ली येथील आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठींबा , बिलोली येथील दलित युवतीचा बलात्कार आणि खुनाचा तीव्र निषेध !     


                            मुखेड : दिनांक 14  रोजी मुखेड शहरात महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन ( लाल बावटा ) संघटनेच्या वतीने मौजे अंबुलगा ( बु . ) , मुखेड शहर आणि तालुक्यातील अनेक गावांत मनरेगा अंतर्गत रोहयोची कामे तात्काळ काढणे आणि इतर मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर शेकडो मजुरांचा मोर्चा धडकला . मोर्चेकऱ्यांनी विविध रोहयो , घरकुल संबंधी मागण्यांच्या घोषणांनी मुखेड शहर दुमदुमले . दिल्ली येथील आंदोलक शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या व त्यांना पाठींब्याच्याही घोषणा देण्यात आल्या . मजुरांचा मोर्चा पोलिसांनी तहसील गेटवर अडवला . मजुरांनी मुख्य रस्त्यावर थांबून आक्रमक घोषणा दिल्या . बिलोली येथे दलित मूकबधिर युवतीचा बलात्कार व खून करण्यात आला त्याचा निषेध नोंदवण्यात आला . प्रशासनाने चर्चेसाठी बोलवले असता युनियनच्या 6 सदस्यांचे शिष्टमंडळ मा . तहसीलदार , मा . गटविकास अधुकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली . मा . तहसीलदार यांनी नगर पालिका मुख्याधिकारी यांच्याशी फोनवर संवाद साधला असता मागण्यांपैकी शहरी रोजगार हमीची कामे सुरू करण्यासंबंधी आणि फुले नगर , वाल्मिक नगर , बजरंग नगर मधील घरे मालकी हक्कात लावणे याविषयी नगर पालिकेच्या आम सभेत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेत असल्याचे सांगण्यात आले . तर ग्रामीण भागातील काम मागणी असलेल्या 14 गावात 28 जानेवारीपर्यंत रोहयोचे काम सुरू करणार असल्याचे लेखी स्वरूपात सांगण्यात आले . याचबरोबर अंबुलगा बु . येथील रोहयोचे काम तातडीने सुरू करण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यासाठी रोहयो कार्यक्रम अधिकारी यांनी प्रक्रिया सुरू करणार असल्याचे सांगितले . सदर मोर्चाचे नेतृत्व युनियनचे जिल्हाध्यक्ष कॉमेड विनोद गोविंदवार , जिल्हासचिव कॉ . अंकुश अंबुकगेकर , जिल्हासहसचिव कॉ . मंजुश्री कबाडे , जिल्हाउपाअध्यक्ष कॉ . माधव देशटवाड , कॉ . पंढरी देशटवाड , कॉ . रामराव यामावाड , कॉ . शिवाजी देवकत्ते , कॉ . रेणुका तुरेवाड , कॉ . पार्वती माळी , कॉ.अनिल पांचाळ यांनी केले . तर एसएफआयचे केंद्रीय उपाध्यक्ष बालाजी कलेटवाड , डीवायएफआयचे जिल्हाउपाध्यक्ष कॉ . अंकुश माचेवाड , एसएफआयचे जिल्हाध्यक्ष कॉ . विजय लोहबंदे , अ . भा . किसानसभेचे कॉ . राजू पाटील , कॉ . लक्ष्मण गिरी , शेकाप चे भाई आसद बल्खी, भाई बबलु शेख यांनी मोर्चाला पाठींबा दिला .

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान