शेतकरी विरोधी कायदा :- मुखेड बाजारपेठ कडकडीत बंद :- जुलमी कायदे रद्द करा - शिवशंकर पाटील कलंबरकर
शेतकरी विरोधी कायदा ; मुखेड बाजारपेठ कडकडीत बंद
जुलमी कायदे रद्द करा - शिवशंकर पाटील कलंबरकर
मुखेड :-
केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या शेतकरी विरोधी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंद ला मुखेडकरांना दांडगा प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच बाजारपेठ दुपारी १२ वाजेपर्यंत कडकडीत बंद ठेवण्यात असले होते. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर म्हणाले की, शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने रद्द करावे, जो पर्यंत जुलमी कायदे रद्द होणार नाहीत तो पर्यंत देशात सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन सुरुच राहणार असल्याचे सांगितले. याआंदोलनात भाजप सोडुन सर्वच सामाजिक राजकीय पक्ष संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होते.
केंद्र सरकारने नव्याने केलेले कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०, शेतकरी सशक्तीकरण आणि संरक्षण किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक २०२० हे रद्द करावेत, कृषी मालाला हमी भाव देण्याची हमी द्यावी, याप्रमुख मागण्यांसाठी दिल्ली येथे केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांनी मंगळवारी दि.८ डिसेंबर रोजी भारत बंद ची हाक दिली. या शेतकरी आंदोलनास प्रतिसाद म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष शिवशंकर पा.कलंबरकर, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी गेडेवाड, प्रहार तालुकाध्यक्ष शंकर वड्डेवार यांनी नियोजन केले. याआंदोलनास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, शेतकरी पुत्र, छावा, संभाजी ब्रिगेड, डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम समाजसेवा समिती, किसान क्रांती संघटना, रोहितदादा पवार मित्र मंडळ, रिपब्लिकन सेना, राजमुद्रा आदी सामाजिक -राजकीय संघटनांनी पाठिंबा दिला. या आंदोलनात माजी जि.प.अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे, भाऊसाहेब पा.मंडलापुरकर, बालाजी पाटील, काँग्रेस शहराध्यक्ष नंदकूमार मडगूलवार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष श्रीपती पाटील पवार, डाॅ.श्रावण रॅपनवाड, शेकाप जिल्हाध्यक्ष अॅड.गोविंद डूमणे, काॅं.पांडूरंग लंगेवाड, शहराध्यक्ष आसद बल्खी, दिलीप कोडगिरे, संतोष बोनलेवाड, माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, नागनाथ लोखंडे, व्यंकटराव लोहबंदे, संजय बेळीकर, सुरेश पाटील बेळीकर, किरण पा.बोडके, अनिल सिरसे, बालाजी ढोसणे, बालाजी पाटील सांगवीकर, रमाकांत पा.जाहूरकर, माधव पाटील होनवडजकर, गिरिधर पा.केरुरकर, दिनेश पा.केेेेरुरकर, पद्मसिंह पाटील वडजे, रामेश्वर पा.इंगोले, जयप्रकाश कानगूले, मारोती घाटे, कैलास माधसवाड, शादूल होनवडजकर, कपील जुन्नेकर, आनंदा शिंपाळे यांच्यासह असंख्य शेतकरी, कार्यकर्ते सहभागी होते.

Comments
Post a Comment