मराठवाडा पदवीधर मध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक
मराठवाडा पदवीधर मध्ये महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांची हॅटट्रिक
मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली . तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली .
प्रतिनिधि :- बल्खी आसद
औरंगाबाद:- दि .04 : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महा विकास आघाडी आणि महायुती या यांच्यात चुरस होईल अशी शक्यता होती , परंतु पदवीधर मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिली पसंती दर्शवली . मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला . चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली महाविकास आघाडीमुळे फायदा झाला आणि मताधिक्य वाढलं अस मत विजयी उमेदवार सतीश चव्हाण व्यक्त केलं . पहिल्या फेरी पासून सतीश चव्हाण यांनी घेतलेली आघाडी पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली . सतीश चव्हाण यांना एकूण 116638 मते मिळाली . तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली . पाचव्या फेरी अखेर सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी घोषित करण्यात आले . मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत 35 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते.

Comments
Post a Comment