मुखेडात मटका, दारू जोमात, पोलीस कोमात

 मुखेडात  मटका, दारू जोमात, पोलीस कोमात
 


मुखेड प्रतिनिधि :- 

 मुखेड तालुक्यात अवैध धंदे जोरात सुरू आहेत .मात्र पोलिस प्रशासन कोमात अशी बिकट अवस्था आहे. पोलिसांच्या वरदहस्तामुळे हे धंदे सुरू आहेत .त्यामुळे पोलीस प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. मुखेड सह इतर गावांतील लोकांचा जास्त संबंध आठवडी बाजार, बँक, तसेच  इतर कामासाठी सर्वाधिक प्रमाणात येतो. याच मुखेड तालुक्यात  मोठ्या प्रमाणावर उघडपणे अवैध धंदे चालू असून यामुळे हजारो नागरिकांचे संसार धुळीला मिळाले आहेत.
      मटक्यामुळे हजारो जणांच्या संसाराच्या राखरांगोळ्या होत असल्याचे आढळून येत असून याकडे जाणून बुजून पोलीस प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागातून येणारे शेतकरी ,व्यापारी, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर मटका ,खेळत असल्याने व हीच पुरुष  मंडळी  घरगुती संसारासाठी लागणारे पैसे इतरांकडून  व्याजाने घेऊन त्यातून मटका खेळणे, दारू पिणे अशा  वाईट सवयीसाठी खर्च   करत असल्याने महिला वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.वीरभद्र मंदिर परिसर ठिकाणी,बारहाळी नाका, परिसर, तगलाईन गल्ली परिसर,जिल्हा परिषद मूली व मुला चे परिसर ,फुले नगर,लोखंडे चौक,बस स्टेण्ड,हॉटेलच्या बाजूला ,पानटपरी अशा अनेक ठिकाणी मटका आणि दारूचे अड्डे आहेत.याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोलीस प्रशासन आणि अवैध धंदे करणाऱ्यामध्ये लागेबांधे असल्याच्या चर्चा देखील चालू आहेत. यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या कामावर प्रश्न निर्माण होत आहेत.
     वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा पोलीस कर्मचाऱ्यावर दबाव नसल्याचे नागरिकांच्या चर्चेत येत आहे.देशी दारूच्या धंद्यामुळे सामान्य स्त्रियांना, मुलांना  पतीकडून होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यास पत्नीला पतीकडून मारहाण होण्याचे प्रकार वाढले आहेत. ग्रामीण भाग असल्याने जास्तकरून महिला या शेतात मजूरी करतात. त्यांना दिवसभर राबराब राबून काबाडकष्ट करावे लागते.संसाराचा गाडा कसाबसा पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतात,मात्र नवरा व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे  महिलांना  नवऱ्याचा मार खाऊन मजूरी करून मिळालेला पैसा नवऱ्याच्या हवाली करावा  लागतो. त्याचा फटका मुलांच्या शैक्षणिक ,आरोग्य या बाबीवर खर्च करण्यासाठी शिल्लक राहत नसल्यामुळे विविध प्रकारचे आजार,शिक्षणाचा खर्च नवऱ्याच्या दारूसाठी खर्च करावा लागतो.पैशाच्या अडचणी मुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे .आणि आरोग्याच्या अनेक अडचणी येत आहेत. १० रुपयाला १०० रुपये या आमिषाने मटका नावाचा  जुगार खेळायला स्त्रियांकडून पैसे बळकावले जात आहेत.परिणामी कष्ट वाया जात असल्याची खंत महिलांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधित पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यावर वचक निर्माण करणार का नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान