नागेश गायकवाड यांचा ' कोविड योध्दा ' म्हणून सन्मानीत
नागेश गायकवाड यांचा ' कोविड योध्दा ' म्हणून सन्मानीत मुखेड तालुक्यातील सांगवी बेनक येथील रहिवासी तथा पुणे महानगरपालिकेत वाहक म्हणून कार्यरत असलेले नागेश भीमराव गायकवाड यांना ' कोविड योध्दा ' म्हणून सन्मानीत करण्यात आले आहे . पुणे महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या कोथरूड -बावधान क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने महापालिका सहाय्यक आयुक्त संदीप कदम व उपायुक्त नितीन उदास यांच्या हस्ते त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला . संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये असताना आपल्या जिवाची बाजी लावून कोरोना महामारीमध्ये पुणे महानगरपालिका अंतर्गत येत असलेल्या कोथरूड - बावधान कार्यक्षेत्रात २०० कर्मचारी वर्गाचे दैनंदिन कामाचे योग्य नियोजन केले . सलग चार महिने जिवाची बाजी लावून कर्तव्य बजावले . पुणे महानगरपालिकेच्या वतीने नागेश गायकवाड यांचा ' कोविड योध्दा ' म्हणून सन्मान करण्यात आला .