आ.राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर समोर मराठा आरक्षणासाठी " जागर आंदोलन "

 आ.राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर

समोर मराठा आरक्षणासाठी " जागर आंदोलन "

मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नासाठी लढाई करणार  : आ रातोळीकर

मुखेड प्रतिनिधि:-  मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने दि.6 ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजता रातोळी येथे भाजपाचे आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या घरासमोर जागर आंदोलन करून लक्ष वेधले मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या :  राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडे

घटनापीठ लवकर स्थापन करण्यासाठी अर्ज करावा, घटनापीठ स्थापन झाल्यानंतर सुनावणी लवकर घ्यावी, घटनापीठ स्थापन केल्यानंतर आरक्षणावरील स्थगिती तात्काळ उठवावी, हे शक्य नसेल तर मराठा आरक्षण बाधित ठेवण्यासाठी नवीन अध्यादेश काढावा, तसेच सारथी संस्था पूर्ववत सुरू करून सार्थीचे कामकाज व विविध कोर्स पुन्हा सुरू करण्यासाठी 1000 कोटी रुपयाचा निधी द्यावा २२ जुलै  2020 पासून महाशिव आघाडी सरकारने परिपत्रक काढून आर्थिक दृष्ट्यादुर्बल घटकांच्या 100% आरक्षणातून मराठा समाजाला वगळण्याचा निर्णय घेतला तो रद्द करून मराठा समाजाला दिलासा द्यावा,मराठा आरक्षणाबद्दल अध्यादेश निघेपर्यंत किंवा स्थगिती उठेपर्यंत मराठा समाजातील मुला - मुलींच्या शिक्षणाची सर्व शैक्षणिक फी व खर्च सरकारने करावा, ज्या युवकांना नौकरीच्या नियुकत्या मिळाल्या त्यांची नियुक्ती कायम ठेवावी, महाराष्ट्र शासनाची मराठा आरक्षणाबद्दल सकारात्मक भूमिका असेल तर मराठा आंदोलकांवर दडपशाही, हेरगिरी ठेवून त्रास देऊ नये असा सज्जड इशारा स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे माधव पाटील देवसरकर यांनी रातोळी येथील जागर आंदोलनाचे नेतृत्व करताना दिला.

         यावेळी प्रदेशाध्यक्ष माधव पाटील देवसरकर ,प्रदेश प्रवक्ते डॉ. बालाजी पेनुरकर,गजानन पाटील माने,विलास पाटील इंगळे, मंगेश पाटील कदम,सुनील मोरतोळीकर,बालाजी पाटील कदम, सुनील पाटील कदम, तिरुपती पाटील कदम, हनुमंत पाटील कदम वाडेकर, जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर, मराठा सेवा संघाचे नागनाथ पाटील बेळीकर ,विनायक पाटील मोहगावकर, आदी स  अनेक जणांच्या स्वाक्षऱ्या भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर यांना दिलेल्या लेखी निवेदनावर आहेत.


 

मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नासाठी लढाई करणार  : आमदार राम पाटील रातोळीकर

=======================================

मराठा आरक्षणाच्या न्यायहक्कासाठी सभागृहात बाजू मांडून रान उठवणार तरीही आरक्षणाबाबत सरकार गांभीर्य घेत नसल्यास रस्त्यावर उतरून मराठा समाजाचा पाईक म्हणून तीव्र आंदोलन करून शंभर टक्के आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असा विश्वास भाजपचे आमदार राम पाटील रातोळीकर यांनी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या जागर आंदोलनाचे निवेदन स्वीकारताना त्यांना आश्वासीत करून दिलासा दिला सोबत युती सरकारच्या काळात मराठा समाजाला टिकणारे आरक्षण तात्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी दिले होते यांची आठवणही करुन दिली.ते दिलेले आरक्षण मा.उच्च न्यायालयात सक्षम बाजू मांडल्यामुळे ते टिकले पण होते. ही वास्तविता बोलवून दाखवली.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान