पिक विमा मंजुर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा:-शेतकरी बचाव संघर्ष समितीची
पिक विमा मंजुर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करा कृषिराज्यमंञी विश्वजीत कदम यांच्याकडे शेतकरी बचाव संघर्ष समितीची मागणी -
बार्हाळी/ प्रतिनिधी
जिल्हातील शेतकऱ्याचे अतिवृष्टी पावसाने पावसामुळे आतोनात नुकसान आहे. शेतकऱ्या च्या हाताला आलेले मुग, उडीद,सोयाबीन पिकाला आक्षरशा मोड आले होते.या नुकसानीमुळे जिल्हातील शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्याचे आर्थिक बजेट कोलमंडले आहेत.देशातील बळीराजा चा सर्वात मोठा सण दिपावळी कशी साजरी करावी हे बळीराजा समोर आव्हान आहे.या सर्व बाजुचा विचार करून सरकारने अतिवृष्टी व ढगफुटीबाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पीकविम्याची रक्कम जमा करण्यात यावा अशी मागणी "विचार छञपतींचा सन्मान बळीराजांचा" हे घोष वाक्य घेवुन मैदानात ऊतरलेल्या शेतकरी बचाव संघर्ष समितीचे धनजंय सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली बालाजी पाटील सांगवीकर,बालाजी पा.ढोसणे यांनी नांदेड येथे राज्याचे कृषिराज्यमंञी विश्वजीत कदम यांची भेट घेवुन केली.
यामध्ये संघर्ष समितीच्या वतीने जाचक अटी रद्द करून शेतकरी कंगाल, पीकविमा कंपनी मालामाल हे धोरण तात्काळ बदलून शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पिकविम्याची रक्कम जमा करावी व
ज्यावर्षी ओला व कोरडा दुष्काळ जाहीर झालेल्या व ५० पैशापेक्षा कमी आनेवारी कमी आलेल्या सर्व
महसूल मंडळात पीक कापणी प्रयोग न करता सरसगट पीकविमा मंजूर करण्यात यावा.,उंबरठा उत्पन्न ७० टक्के ऐवजी ९० टक्के करण्यात यावे, यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल,पीकविमा मंजुरीबाबत सुरू असलेले पीक कापणी प्रयोग मंडळ स्तरावरून गावस्तरावर घेतले जावेत,पाऊस पर्जन्यमान केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी,सरासरी पाच वर्षांची अट रद्द करून ज्यावर्षी ज्या पिकावर विमा भरला त्याच पिकाच्या परिस्थितीवर
शेतकऱ्यांना विमा कवच देण्यात यावे.
अशी मागणी शेतकरी बचाव संघर्ष समितीचे धनजंय सुर्यवंशी,बालाजी पा.सांगवीकर,बालाजी पा.ढोसणे यांनी केली.

Comments
Post a Comment