मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील पडीत जागेवर फुलवीले नंदनवन
मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील पडीत जागेवर फुलवीले नंदनवन
रामदास पाटील सुमठाणकर मित्रपरिवाराचा स्तुत्य उपक्रम
मुखेड प्रतिनिधि:- बल्खी आसद
मुखेड, देगलूर तालुक्यात स्वप्रसिद्धीची कुठलीच अपेक्षा न करता निश्वार्थ भावनेने दु:खीतांची सेवा हेच आपलं कर्तव्य मानणारे रामदास पाटील सुमठाणकर यांच्या संकल्पनेनुसार प्रत्येक सामाजिक कार्य व उपक्रमात निश्वार्थपणे साथ देणारा त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व पुर्व प्रधानमंत्री लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या पडीत जागेत पिण्याचे पाणी, नागरिकांना बसण्यासाठी आसनव्यवस्था, वृक्षारोपन, लाईटची व्यवस्था करुन नंदनवन फुलवले त्यामुळे त्यांच्या या सामाजिक कार्यामुळे या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
रामदास पाटील मित्र परिवाराच्या वतीने लाॅकडाऊन सुरू झाल्यापासून सर्वसामान्य गोरगरीब समाज हा अन्नावाचून उपाशी राहता कामा नये एकवेळ आपण उपाशी राहू परंतू गरीब कुटुंबाना अन्नाचा पुरवठा करू ! हे ध्येय उराशी बाळगुन आजपर्यंत अविरतपणे शहरातील खाजगी व शासकिय रूग्णालयातील रूग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना आजही जेवणाचा डब्बा पुरविला जात आहे. तसेच कोरोना या महाभयंकर रोगाच्या काळात घरात बसलेल्या वंचित गोर गरीबांना हजारो किट धान्य वाटप केले तर मागील एेंशी दिवसांपासुन रोज १५० ते १६० रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना मोफत डब्बा पुरविला जात आहे. त्यामुळे दु:खी-पिढितांच्या ह्दयात नक्कीच नोंद करण्यासारखं या मित्र परिवाराचं कार्य आहे अशी चर्चा सर्वसामान्यांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

Comments
Post a Comment