आंबुलगा येथील शिक्षक बिरादार डि. व्हि यांना केंद्रातर्गत गुरू गौरव पुरस्कार प्रदान
आंबुलगा येथील शिक्षक बिरादार डि. व्हि यांना केंद्रातर्गत गुरू गौरव पुरस्कार प्रदान
मुखेड / प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा बु) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक बिरादार डि व्हि यांनी आंबुलगा केंद्रात शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल, यंदाचा केंद्रगस्तरीय आदर्श शिक्षक म्हणून गुरू गौरव पुरस्कार मिळाले आहे.
हा पुरस्कार मुखेड पंचायत समितीचे सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी राम भारती व नुतून गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांच्या हस्ते बिरादार यांना गुरूगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
बिरादार डि.व्हि हे आंबुलगा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी आंबुलगा येथील शाळेत विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले. प्रत्येक उपक्रमात त्याचा सहक्रीय सहभाग असतो. विद्यार्थ्यांना नेहमी त्यांच मौलाचे मार्गदर्शन असते.या सर्व कार्याची नोंद घेऊन त्यांना यंदा आंबुलगा केंद्रातील शाळेतून आदर्श शिक्षक म्हणून गुरू गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल आंबुलगा येथील सरपंच सौ.सुशिलाताई संजयराव आकुलवाड, उपसरपंच काॅम्रेड विनोद गोविंदवार, शालेय वेवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर पाटील, केंद्राचे केंद्रप्रमुख दासरवाड एस. एल., मुख्याध्यापक साईबाबा नल्लामडगे, व शाळेतील शिक्षक जवळदापके, पेंडलवार, गौंड, स्वामी, मोरे मॅडम, धमणे मॅडम, दैनिक बालाघाट चे प्रतिनिधी पत्रकार पवन जगडमवार अदिने शुभेच्छा दिले.

Comments
Post a Comment