‘नुकसानग्रस्त सोयाबीनची माहिती विमा कंपनी, कृषी विभागास कळवा’: बालाजी पाटील ढोसणे यांचे शेतकर्‍यांना आवाहन

 ‘नुकसानग्रस्त सोयाबीनची माहिती विमा कंपनी, कृषी विभागास कळवा’: बालाजी पाटील ढोसणे यांचे शेतकर्‍यांना आवाहन



मुखेड (प्रतिनिधी) पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या, पावसाने सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची माहिती पीक विमा दाव्यासाठी कृषी विभाग तसेच विमा कंपनीस  तत्काळ कळवावी, असे आवाहन शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांनी केले.


सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन कापणी करुन गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी ठेवली आहे. पावसामुळे हे सोयाबीन भिजले असल्यास पीकविमा योजनेत सहभागी शेतकऱ्यांना काढणीपश्‍चात नुकसान भरपाईसाठी पीक विमा परतावा मिळू शकतो. त्यासाठी पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करुन सुकवण्यासाठी पसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून १४ दिवसांत गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस, अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येतात.

यासाठी शेतकऱ्यांनी ही घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबतची सूचना इफको टोकीयो पीक विमा कंपनी किंवा कृषी विभागास देणे बंधनकारक आहे. 

नुकसान काळविताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे अनिवार्य आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करेल. या मध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी व संबंधित शेतकऱ्यांचा समावेश असेल.

पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल १० दिवसांत सादर करण्यात येईल. त्यादृष्टीने बाधित शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून crop insurance हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा १८००१०३५४९०  या टोल फ्री क्रमांकावर किंवा  supportagri@iffcotokio.co.in या ई-मेल वर किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावे, असे आवाहन बालाजी ढोसणे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान