शेतकऱ्यांचे कृषी वीज पंपांना कायम स्वरुपी दिवसा वीज पुरवठा करा:- किसान युवा क्रांती संघटना
शेतकऱ्यांचे कृषी वीज पंपांना कायम स्वरुपी दिवसा वीज पुरवठा करा:- किसान युवा क्रांती संघटना. मुखेड प्रतिनिधि:- बल्खी आसद। राज्यात महावितरण कंपनी कडून कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर रात्री पहाटे वीज पंप चालू करण्यास जावे लागते. अशा परिस्थितीत लाईट नसल्यामुळे पेटीतील फ्युज टाकणेस अडचणी येतात. कधी कधी पेटीत वीज प्रवाह उतरल्याचा धोका लक्षात येत नाही. तसेच अंधारा मुळे साप, विंचू वगैरे पासून पेटी जवळ व रस्त्यावर सतत धोका होत असतो. तर कधी अंधारात वन्य प्राणी शेतकऱ्यांवर प्राण घातक हल्ला करतात व अशा प्राण घातक हल्याच्या देखील अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत. नुकताच जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील पळासखेडे या गाव शिवारात कृषी पंप पेटी जवळ वीज प्रवाह उतरल्याने व अंधारात शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे एकाच दिवशी लागोपाठ जाधव कुटुंबातील तीन भावांचा...