"डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिती मुखेड" च्या वतीने आयोजित आणि पार पडलेल्या भव्य ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे बक्षीस वितरण पार
"डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिती मुखेड" च्या वतीने आयोजित आणि पार पडलेल्या भव्य ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे बक्षीस वितरण पार
मुखेड: माजी राष्ट्रपतीजी सन्माननीय ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दि. 15 ते 25 ऑक्टोबर 2020 दरम्यान "डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिती मुखेड" च्या वतीने आयोजित आणि पार पडलेल्या भव्य ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा दिनांक 1 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजता पार पडला.
सदर बक्षीस वितरण लक्ष्मीबंधन अर्बन नि. ली. मुखेडचे संचालक श्री लक्ष्मीकांत अशोकराव पापंटवार आणि झेप कोचिंग क्लासेसचे संचालक श्री महेश वंटेकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद हायस्कुल (मुलींचे) या शाळेतील कला शिक्षक मा. सय्यद अकबर सर यांची विशेष उपस्थिती होती. कोरोना संक्रमणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. परीक्षक स्वतः योग्य ती काळजी घेत स्पर्धकांच्या घरी सहभागी स्पर्धकांच्या 'विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रेझेंटेशन' चे परीक्षण करून निकाल जाहीर केला. सदर स्पर्धा आणि बक्षीस वितरण सोहळा यशस्वी करण्यासाठी "डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम समाज सेवा समिती मुखेड" चे एस. के. बबलू आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
प्रथम व द्वितीय पारितोषिक प्राप्त झालेल्या विध्यार्थीचे नाव
गट ८ ते १०
पोस्टर स्पर्धा गट १ ली ते ४ थी
प्रथम पारितोषिक :- दमकोंडवार श्रध्दा वैजनाथराव
द्वितीय पारितोषिक:- पांचाळ पद्मनभ प्रकाशराव
गट ५ वी ते ७ वी
प्रथम पारितोषिक :-गुंडेवार धनश्री
द्वितीय पारितोषिक:- मुंडे हर्षदा & भक्ती सूर्यकांत पांचाळ
८ वी ते १० वी
प्रथम पारितोषिक :- सय्यद रिजवान नविदोद्दिन
द्वितीय पारितोषिक:- मामिलवाड ऋतुजा :-
मॉडल स्पर्धां
प्रथम पारितोषिक:- स्वामी नम्रता नागनाथ
द्वितीय पारितोषिक:- पांपटवार सावली लक्ष्मीकांत & सय्यद मदिहाफातेमा नविदोद्दिन

Comments
Post a Comment