शेतकऱ्यांचे कृषी वीज पंपांना कायम स्वरुपी दिवसा वीज पुरवठा करा:- किसान युवा क्रांती संघटना

 शेतकऱ्यांचे कृषी वीज पंपांना कायम स्वरुपी दिवसा वीज पुरवठा करा:-  किसान युवा क्रांती संघटना.    


                       मुखेड प्रतिनिधि:- बल्खी आसद।                               राज्यात महावितरण कंपनी कडून कृषी पंपांना रात्री वीज पुरवठा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावर रात्री पहाटे वीज पंप चालू करण्यास जावे लागते. अशा परिस्थितीत लाईट नसल्यामुळे पेटीतील फ्युज टाकणेस अडचणी येतात. कधी कधी पेटीत वीज प्रवाह उतरल्याचा धोका लक्षात येत नाही. तसेच अंधारा मुळे साप, विंचू वगैरे पासून पेटी जवळ व रस्त्यावर सतत धोका होत असतो. तर कधी अंधारात वन्य प्राणी शेतकऱ्यांवर प्राण घातक हल्ला करतात व अशा प्राण घातक हल्याच्या देखील अनेक घटना आजपर्यंत घडलेल्या आहेत.

नुकताच जालना जिल्ह्यात भोकरदन तालुक्यातील पळासखेडे या गाव शिवारात कृषी पंप पेटी जवळ वीज प्रवाह उतरल्याने व अंधारात शेतकऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे एकाच दिवशी लागोपाठ जाधव कुटुंबातील तीन भावांचा शॉक  लागून मृत्यू झाला व संपूर्ण कुटुंबच पोरके झालेले आहे. 

शेतकऱ्यांना  दिवसा वीज पुरवठा मिळत नसल्यामुळे वरील जाधव बंधूंचे मृत्यूस महावितरण कंपनी जबाबदार आहे. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडून शेतकरी कुटुंबावर शोककळा पसरू नये व त्यांच्या कुटुंबाचा आधार हिरावला जाऊ नये म्हणून कृषी पंपांना तत्काळ दिवसा वीज पुरवठा करण्याचे नियोजन व्हावे.

तसेच रात्रीच्या वेळेस ग्रामीण भागात ट्रान्सफॉर्मर चा फ्यूज गेल्यास रात्री वीज कंपनीचा कोणीही कर्मचारी उपलब्ध नसतो. त्यामुळे कृषी पंपांना रात्रीचां वीज पुरवठा नीट मिळत नाही. त्यामुळे ह्या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की, कृषी पंपाना दिवसाच वीज पुरवठा होईल असेच नियोजन करावे. त्याच प्रमाणे शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर फेल झाल्यास ४८ तासाचे आत दुरुस्ती किंवा बदलण्याची देखील व्यवस्था करावी, अन्यथा शेतकऱ्यांना  महावितरण कंपनीचे विरोधात सनदशीर मार्गाने आंदोलन कारण्याचा इशारा ही देण्यात आले त्या वेळी माधव पाटील होनवडजकर किसान युवा क्रांती संघटना अध्यक्ष दिनेश पाटील केरूरकर, रमाकांत पाटील जाहुरकर, दत्तात्रय देवकर हे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान