‘मुखेड नपा’ निवडणूक ‘शेकाप’ स्वबळावर लढणार
मुखेड : मुखेड नगरपालिकेची आगामी निवडणूक शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर
लढविण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी पक्षाचे शहर चिटणीस भाई आसद बल्खी होते. भाई गोविंद डुमने म्हानाले,
नगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या डिसेंबर, जानेवारी मधे होण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी मंडळींनी तयारी सुरू केली असली, तरी मुखेडच्या ज्वलंत प्रश्नांचा त्यांना
विसर पडला आहे. बेगडी समाजकार्य करणारी मंडळी पुन्हा पुढे येत आहेत. या प्रवृत्तीला
बाजूला करण्यासाठी ‘शेकाप’ स्वबळावर रिंगणात उतणार आहे. या निवडणुकीत निष्ठावंत व
विचाराने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असा सर्वानुमते ठराव
बैठकीत करण्यात आला. यावेळी भाई पांडुरंग लंगेवाड, भाई राजु पाटील हसनाळकर,भाई बबलु
एस के ,भाई आसद बल्खी, भाई लक्ष्मण चिवळीकर,भाई संजू अडगुलवार, भाई बाबुराव कांबळे, भाई नागोराव पाटील आदी पदाधिकारी उपस्तित होत.
Comments
Post a Comment