मुखेड तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांसाठी अजूनही 2 हजार शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत :- डॉ. रणजीत काळे
मुखेड तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांसाठी अजूनही 2 हजार शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत :- डॉ. रणजीत काळे
मुखेड/ प्रतिनिधि :- आसद बल्खी :- तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग नवीन पीक कर्जापासून वंचित झाला आहे.याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाच्या लाभ मिळवून द्यावा , अशा मागणीचे निवेदन डॉ . रणजित काळे यांनी पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना दिले
महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनांमध्ये गेल्या वर्षी मुखेड तालुक्यातील जवळपास 3000 शेतकरी कर्ज माफी च्या लाभार्थी यादी मध्ये आले होते त्या पैकी 1000 शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण उर्वरित 2000 शेतकरी अजूनही कर्ज माफी चां प्रतीक्षेत आहेत.
शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी महा विकास आघाडी सरकारने दोन लाखापर्यंत घोषित केली होती तरी कर्जमाफी पात्र असलेल्या मुखेड तालुक्यातील जवळपास दोन हजार शेतकऱ्यांचे कर्जमाफी चे पैसे जमा न झाल्यामुळे नवीन पीक कर्जा पासून शेतकरी वंचित आहेत.तरी लवकरात लवकर कर्जमाफीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करून नवीन पीक कर्ज भेटण्यासाठी माननीय डॉ.रंणजीत काळे युवक काँग्रेस कार्याध्यक्ष मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघ यांनी अशोकराव चव्हाण सार्वजनिक रस्ते व बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नांदेड यांना शासनाकडे पाठपुरावा करून लवकरात लवकर वंचित शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन हजार शेतकऱ्यांच्या यादी सहित निवेदन दिले.
त्या वेळी उपस्थित मा.आ हणमंतराव पाटील बेटमोगरेकर . तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर दिलीप पाटील बेटमोगरेकर वखरब खंडगाव चे उपसरपंच प्रतिनिधी परमेश्वर तरटे . एन एस यु आय तालुका अध्यक्ष अविनाश काळे.माजी सरपंच व्यंकटराव एकाळे. माजी सरपंच साहेबराव कांबळे. ग्रामपंचायत सदस्य श्री बालासाहेब शेख. श्री हिरामण कांबळे. यांची उपस्थिती होती.

Comments
Post a Comment