Posts

Showing posts from August, 2021

‘मुखेड नपा’ निवडणूक ‘शेकाप’ स्वबळावर लढणार

Image
‘मुखेड नपा’ निवडणूक ‘शेकाप’ स्वबळावर लढणार मुखेड : मुखेड नगरपालिकेची आगामी निवडणूक शेतकरी कामगार पक्षाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी पक्षाचे शहर चिटणीस भाई आसद बल्खी होते. भाई गोविंद डुमने म्हानाले, नगरपालिकेची निवडणूक येणाऱ्या डिसेंबर, जानेवारी मधे होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी मंडळींनी तयारी सुरू केली असली, तरी मुखेडच्या ज्वलंत प्रश्नांचा त्यांना विसर पडला आहे. बेगडी समाजकार्य करणारी मंडळी पुन्हा पुढे येत आहेत. या प्रवृत्तीला बाजूला करण्यासाठी ‘शेकाप’ स्वबळावर रिंगणात उतणार आहे. या निवडणुकीत निष्ठावंत व विचाराने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना उमेदवारी द्यावी, असा सर्वानुमते ठराव बैठकीत करण्यात आला. यावेळी भाई पांडुरंग लंगेवाड, भाई राजु पाटील हसनाळकर,भाई बबलु एस के ,भाई आसद बल्खी, भाई लक्ष्मण चिवळीकर,भाई संजू  अडगुलवार, भाई बाबुराव कांबळे, भाई नागोराव पाटील आदी पदाधिकारी उपस्तित  होत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुरवीर सुधाकररावजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

Image
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुरवीर सुधाकररावजी शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण मुखेड प्रतिनिधी :-  मुखेड तालुक्यातील बामणी येथील शहिद सुपुत्र सुधाकररावजी शिंद यांच्यावर दिनांक 20 ऑगस्ट 2021 रोजी छत्तीसगड मधील नारायणपूर येथील नक्षलवादी हल्ल्यात सुधाकररावजी शिंदे शहिद झाले  त्यामुळे परिसरात शोककाळा पसरली आहे . दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये सरकार ने त्यांच्या कार्याची दखल घेऊन छत्तीसगड मधील नारायणपूर येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांना बढती देण्यात आली होती .अशा शुरवीर जवानाला मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या वेळी नांदेड रा.कॉ.सो. मी.जिल्हाअध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर) नांदेड रा.कॉ.जिल्हा संघटक शंकर पाटील श्रीरामे ,मुखेड शहर कार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे, प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड,रा. युवक विधानसभा अध्यक्ष दिनेश पाटील केरूरकर,मुखेड रा.युवती कॉ.ता.अध्यक्ष पंचवटीताई गोंडाले,मुखेड रा.महिला कॉ.शहर अध्यक्ष Ad भाग्यश्रीताई कासले, शहर सचिव अशोक बचेवार,ता.कोषाध्यक्ष आनंदा शिंपाळे,रा.विद्यार्थी कॉ.विधानसभा अध्यक्...

मुखेड तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांसाठी अजूनही 2 हजार शेतकरी कर्ज माफीच्या प्रतीक्षेत :- डॉ. रणजीत काळे

Image
 मुखेड तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांसाठी अजूनही 2 हजार शेतकरी कर्ज माफीच्या  प्रतीक्षेत  :- डॉ. रणजीत काळे मुखेड/ प्रतिनिधि :- आसद बल्खी :-                                                                                                     तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनांमध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्यामुळे शेतकरी वर्ग नवीन पीक कर्जापासून वंचित झाला आहे.याकडे शासनाने त्वरित लक्ष देऊन शेतकऱ्यांना नवीन पीक कर्जाच्या लाभ मिळवून द्यावा , अशा मागणीचे निवेदन डॉ . रणजित काळे यांनी  पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण यांना दिले              महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजनांमध्ये गेल्या वर्षी मुखेड तालुक्यातील जवळपास 3000 शेतकर...