आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी रिजवान नविदोद्दीन सय्यद दहावीत ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन

 आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी रिजवान नविदोद्दीन सय्यद दहावीत ९९.४० टक्के  घेऊन उत्कृष्ट यश संपादन

मुखेड / प्रतिनिधी 

      शहरातील आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी सय्यद रिजवान सय्यद नविदोद्दीन याने दहावीत ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन केल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
       कोरोना प्रादुर्भावामुळे यावर्षी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परिक्षा होऊ शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्य मापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला निकाल शुक्रवारी दि.१६ जुलै रोजी जाहिर करण्यात आला. यात शहरातील आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमच्या शाळेतील विद्यार्थी सय्यद रिजवान सय्यद नविदोद्दीन याने दहावीत एकूण ५०० पैकी ४९७ गुण, ९९.४० टक्के घेऊन उत्कृष्ट यश संपादन केले. रिजवानचे आजोबा सय्यद हमीद हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. तर वडील सय्यद नविदोद्दीन टि.वी.मेकॅनिक आहेत. परिस्थितीशी संघर्ष करत सय्यद रिजवान ने यश संपादन केल्याबद्दल प्रा.सखाराम गोरे सर आॅसम चाइल्डहुड पब्लिक स्कूलचे संचालक संतोष कोडगीरे सर, डाॅ.श्रावण रॅपनवाड, पत्रकार  रियाज शेख, मुनवर शेख, पत्रकार महेताब शेख, पत्रकार बबलु मुल्ला, सय्यद अकबर, सय्यद रशीद ,सय्यद पाशा,एस के बबलु,डॉ. तौसिफ परदेशी, अॅड. असलम शेख, खाजा धुंदी, शादुल होनवजकर, इमरान पठान, इंजि.मुजाहेद परदेशी,आरेफ बल्खी, आसद बल्खी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान