मुखेड शहरातील वाल्मीक नगर व इतर प्रभागात दुषित व गढुळ पाण्याचा पुरवठा.
मुखेड शहरातील वाल्मीक नगर व
इतर प्रभागात दुषित व गढुळ पाण्याचा पुरवठा.
मुखेड/
प्रतिनिधि :- आसद बल्खी
मुखेड शहरातील वाल्मीक नगर व विविध
भागात नळावाटे नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचे चित्र विविध
प्रभागात दिसून येत असून या दुर्गंधीयुक्त व गढुळ असलेले हे पाणी
पिण्यायोग्य नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. आणि त्यामुळे
नागरिकांच्या जीवाला धोका देखील निर्माण झाला आहे.
शहरातील
विविध प्रभागात नागरीकांनी न.प. पाणी पुरवठा विभागामार्फत पाईपलाईनव्दारे
पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे विविध प्रभागातील
नागरीकांना 3 ते 4 दिवसआड पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे नागरीकांना
हे पाणी साठवून ठेवावे लागते. अशातच
शहरातील काही प्रभागात गढुळ व दुषित पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जात
असल्याचे नागरीकांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी कसे
वापरावे असा प्रश्न नागरीकांसमोर उभा आहे. शहरातील पिण्याच्या पाण्याची
पाईप लाईन ही गेल्या कित्येक वर्षापासून बदलली गेली नसल्यामुळे ती
ठिकठिकाणी गंजुन खराब झाली आहे.
अशातच गेल्या काही दिवसांपासून शहरात ठिकठिकाणच्या प्रभागात
नागरीकांना गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. या पाण्याला एक प्रकारचा घाणदर्प
असल्याचा अनुभव नागरीकांना येत असून हे पाणी पिल्यामुळे नागरीकांना विविध
आजार जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या लोक कामा धंदा विना घरात
बसून आहेत, पैशाची अडचण आहे, खाण्यापिण्याची ही मोठी अडचण आहे.
मुखेड
मध्ये अनेक लोक गरीब आहेत, कोरोनामुळे सर्व मुखेड करांच्या आरोग्याची
दक्षता, काळजी व खबरदारी घेण्याचे काम नपा असतानाही अशा अशावेळी ही येथील
लोकांना असा दूषित पाणीपुरवठा केला गेला व ते आजारी पडले तर त्याला जबाबदार
कोण ।।असा प्रश्न काही वॉर्डातून नपाला विचारला जात असून मुखेड नपा नगर
परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत असलेल्या या
गंभीर प्रश्नाकडे त्वरीत लक्ष देवून नागरीकांना स्वच्छ पिण्याच्या
पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी संभाजी ब्रिगेड चे संतोष पा इंगोले, शेकाप चे भाई पांडुरंग लंगेवाड व
नागरीकांमधून होत आहे

Comments
Post a Comment