रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुखेड,देगलुर तालुक्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन

 रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त  मुखेड,देगलुर तालुक्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन

मुखेड / प्रतिनिधी       


गरजूंसाठी मदतीचा हात ह्या उपक्रमा अंतर्गत हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी तथा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने दि. १२ एप्रिल रोजी मुखेड - कंधार विधानसभा मतदार संघात ठिकठिकाणी भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती रामदास पाटील सुमठाणकर मित्रपरिवाराच्या वतीने देण्यात आली.
       नांदेड जिल्ह्यात मार्च महिन्यात कोरोनाने थैमान घातले असून त्याचा फटका रक्त संकलनावर पडला आहे. कोरोनाच्या ह्या कठीण काळात झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रामदास पाटील सुमठाणकर मित्रपरिवाराच्या सहकाऱ्यानी दि.१२ एप्रिल रोजी रामदास पाटील सुमठाणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान ग्रामपंचायत कार्यालय, पेठवडज, राजे संभाजी चौक जाहुर, बस्टस्टॅण्ड चौक मुक्रमाबाद, विद्या विकास विद्यालय बाऱ्हाळी , छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर मुखेड, लोकनेते , माजी नगराध्यक्ष  कै. मष्नाजी निलमवार साहेब सभागृह , गोकुळनगर देगलूर ह्या ६ ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या कठिण काळात सीजेरियन व डायलेसिसच्या रुग्णांना रक्ताची अडचण भासत आहे. नांदेड शहरातील शासकीय व खासगी रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा वाढत असल्याने जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

जगप्रसिध्द खॉजा मैनोद्दिन चिस्ती रहमतुल्ला बदल अपशब्दाचा वापर केल्याबदल न्युज 18 चे एंकर अमिष देवगण विरुध्द गुन्हा दाखल करा :- हाफिज अब्दुल गफार

पालकमंत्री अशोकराव चव्हाण व काँग्रेस पक्षातर्फे सावरगाव येथे धान्य वाटप

शिवाजी फाऊंडेशन व लोकसंकेत मराठी वृत्तपत्रांच्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या कोरोनायोद्धाचा सन्मान